Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 6: धक्कादायक! दिव्या शिंदेला 'बिग बॉस'ने घराबाहेर काढलं; तलवार चालवण्याची दिली धमकी, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 21:42 IST

'बिग बॉस मराठी ६' मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सरकार अशी ओळख असणाऱ्या दिव्या शिंदेला 'बिग बॉस'ने घराबाहेर काढलं आहे.

Divya Shinde Eliminated: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 'सरकार' अशी ओळख असणाऱ्या दिव्या शिंदेला 'बिग बॉस'ने घराबाहेर काढलं आहे. दिव्याने नॅशनल टेलिव्हिजनवर तलवार चालवण्याची आणि स्पर्धकांना जीवे मारण्याची भाषा केली होती. त्यामुळे 'बिग बॉस'ने दंड स्वरुप दिव्या शिंदेला थेट घराबाहेर काढलं आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. दिव्या शेवटपर्यंत तिच्या म्हणण्यावर ठाम होती. काय घडलं नेमकं?दिव्याने दिली सर्वांना धमकी'बिग बॉस मराठी ६'मध्ये आज एक टास्क झाला. यात घरात सहभागी नसलेल्या सदस्याच्या चेहऱ्यावर क्रॉस चिन्हाचं लाल रंगाचं पेंट मारायचं होतं. जेव्हा तन्वीची वेळ आली तेव्हा तिने दिव्याचं नाव घेतलं. दिव्याला हे ऐकताच राग अनावर झाला. तिने बिग बॉसच्या घरातील सदस्यांना उद्देशून तलवार चालवण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. बिग बॉसने तिला रोखलं तरीही दिव्या ऐकत नव्हती. ''हो ही धमकीच आहे'', असं दिव्या वारंवार म्हणत राहिली. परिणामी, बिग बॉसने दिव्या आणि राकेश बापटला कन्फेशन रुममध्ये बोलावलं.

झालेली चूक सुधारण्याची दिव्याला बिग बॉसने संधी दिली. परंतु दिव्या तिच्या म्हणण्यावर ठाम होती. राकेशने सुद्धा दिव्याला भाषा जपून वापर, असा सल्ला दिला. परंतु दिव्या ऐकत नव्हतं. शेवटी पुढच्या दिवशी सर्व सदस्य हॉलच्या भागात आले असताना दिव्याकडून झालेल्या मोठ्या चुकीचा बिग बॉसने उल्लेख केला. सदस्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बिग बॉसने दंड म्हणून दिव्याला तातडीने घरातून बाहेर काढलं. दिव्या जाताना दिपाली सय्यदच्या डोळ्यातून पाणी आलं. राकेश बापट आणि सर्वांना धक्का बसला. परंतु डोळ्यांतून अश्रू न गाळता दिव्या सर्वांचा निरोप घेऊन घराबाहेर गेली. अशाप्रकारे 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात आज हाय वोल्टेज ड्रामा घडला. दिव्या घरातील स्ट्राँग स्पर्धक होती. परंतु स्वतःच्या भाषेवर नियंत्रण न राहिल्याने आणि नॅशनल टेलिव्हिजनवर धमकी दिल्याने 'बिग बॉस मराठी ६'मधून दिव्या शिंदेला बाहेर जावं लागलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss Marathi 6: Divya Shinde Evicted for Threatening Violence

Web Summary : Divya Shinde was evicted from Bigg Boss Marathi 6 after threatening to use a sword and harm other contestants on national television. Bigg Boss took swift action due to her violent language, leaving everyone shocked. Divya remained defiant until the end.
टॅग्स :बिग बॉस १९टेलिव्हिजनटिव्ही कलाकारबिग बॉस मराठी ६व्हायरल व्हिडिओ