Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता'मध्ये दिशा वकानीच्या वडिलांनीदेखील केलंय काम; तुम्हाला आठवतोय का हा एपिसोड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 09:31 IST

Disha vakani: या मालिकेत दिशा आणि तिच्या वडिलांसोबतच तिच्या भावानेदेखील काम केलं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. जवळपास १३ -१४ वर्षापासून ही मालिका लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. त्यामुळे या मालिकेविषयी, त्यातील कलाकारांविषयी अनेक किस्से प्रेक्षकांमध्ये चर्चिले जातात. या मालिकेत सर्वाधिक चर्चा झाली ती दयाबेन या भूमिकेची. अभिनेत्री दिशा वकानी हिने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे दिशासोबतच तिच्या वडिलांनीदेखील या मालिकेत काम केलं आहे.

दयाबेनच्या भूमिकेला न्याय देणारी दिशा सध्या या मालिकेत काम करत नाही. दिशाने ही मालिका सोडून बरीच वर्ष झाली आहेत. त्यामुळे तिच्या कमबॅकची वाट सगळेच चाहते करत आहेत. दयाबेनची भूमिका जिवंत करणाऱ्या दिशासोबतच तिच्या वडिलांनीदेखील या मालिकेतील एका भागात काम केलं आहे. सध्या या एपिसोडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिशाचे वडील भीम वकानी हे प्रसिद्ध थिएटर आर्टिस्ट होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या भूमिका केल्या. यामध्येच त्यांनी तारक मेहता मध्ये त्यांच्या लेकीसोबतही स्क्रीन शेअर केली.  तारक मेहतामधील एका भागात भीम वकानी यांनी चंपकलाल यांच्या मित्राची मावजी भाई यांची भूमिका साकारली होती. मावजी भाई यांच्या मुलाचं लग्न असल्यामुळे ते लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी जेठालाल यांच्या घरी येतात. यावेळी जेठालालसोबत एक मजेशीर किस्सा घडतो. लग्नात कूकर गिफ्ट करण्याऐवजी त्यांच्याकडून ५० हजार रुपये आहेर दिला जातो. या मजेशीर एपिसोडचा किस्सा सध्या युट्यूबवर पाहिला जात आहे. २९ जानेवारी २०१४ चा असलेला हा एपिसोड १२ वर्षापूर्वी विशेष गाजला होता. युट्यूबवर या एपिसोडला  जवळपास २६ मिलियन व्ह्यूज मिळाले होते.

दरम्यान, या मालिकेत दिशा आणि तिच्या वडिलांसोबतच तिच्या भावानेदेखील काम केलं आहे. मालिकेतील सुंदर वीरा खऱ्या आयुष्यातही दिशाचा भाऊ आहे. त्यामुळे या मालिकेत दिशाच्या भावाने अन् वडिलांनी दोघींनीही दिशासोबत स्क्रीन शेअर केली आहे. भीम वकानी यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं. भीम वकानी यांनी आमिर खानच्या लगान या सिनेमातही काम केलं होतं. या सिनेमात त्यांनी काजी साहिब ही भूमिका साकारली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Disha Vakani's father also worked in 'Taarak Mehta'!

Web Summary : Disha Vakani's father, Bhim Vakani, a theatre artist, played Champaklal's friend in 'Taarak Mehta'. The episode, featuring a funny incident with a wedding gift, went viral and got millions of views. Her brother also acted in the show.
टॅग्स :टेलिव्हिजनतारक मेहता का उल्‍टा चश्‍मासेलिब्रिटीसिनेमाआमिर खान