Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्जरीनंतर दीपिका कक्करने शेअर केली पोस्ट, म्हणाली, "अल्लाह सगळं पाहत आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:33 IST

कठीण प्रसंगाला तोंड दिल्यानंतर आता तिने पहिली पोस्ट शेअर केली आहे

'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) नुकतीच आजारातून बरी झाली आहे. सुरुवातीला ती पोटदुखीमुळे त्रस्त होती. नंतर लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. काही दिवसांपूर्वीच तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. आता दीपिका हळूहळू बरी होत आहे. या सर्व कठीण प्रसंगाला तोंड दिल्यानंतर आता तिने पहिली पोस्ट शेअर केली आहे.

सर्जरीनंतर दीपिका कक्कर व्लॉगमध्ये दिसली होती. तिने किती वेदना सहन केल्या याचा अनुभव तिने सांगितला. आता तिने सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "अल्लाह बघत आहे, अल्लाहला सगळं माहित आहे आणि अल्लाह सगळं ठीक करेल."

दीपिकाची सर्जरी १४ तास चालली. नंतर ती आयसीयूतून बाहेर आली. आपल्या दीड वर्षांच्या मुलासाठी दीपिकाचा जीव तुटत होता. त्याला भेटून ती खूश झाली. दुसरीकडे तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम तिची दिवसरात्र काळजी घेत होता. व्लॉगमधून तो तिच्याबद्दल माहिती देत होता. आता दीपिका बरी होत असून अनेकांनी तिच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली. 

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे 'ससुराल सिमर का' मालिकेत एकत्र काम करत होते. तिथेच ते प्रेमात पडले. दीपिकाचं हे दुसरं लग्न आहे. दीड वर्षापूर्वीच तिला मुलगा झाला ज्याचं नाव 'रुहान' ठेवण्यात आलं आहे.

टॅग्स :दीपिका कक्करटिव्ही कलाकारकर्करोग