Join us
Daily Top 2Weekly Top 5

लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 09:34 IST

तब्बल ११ दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर आता दीपिकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती देत हेल्थ अपडेट दिले आहेत. त्याबरोबरच डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही दिवसांपासून लिव्हर ट्युमरचा सामना करत आहे. सुरुवातीला ट्युमर असल्याचं समजल्यानंतर दीपिकाला स्टेज २ लिव्हर कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर दीपिकाची सर्जरी करून हा लिव्हर ट्युमर काढण्यात आला. तब्बल ११ दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर आता दीपिकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती देत हेल्थ अपडेट दिले आहेत. त्याबरोबरच डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. 

दीपिकाने तिच्या सोशल मीडियावरुन हॉस्पिटल कर्मचाऱ्यांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहून आता घरी जात आहे. ट्यूमर काढला आहे. पण, हा ट्रीटमेंटचा फक्त एक भाग आहे. बाकीचे उपचार येत्या काळात सुरू होतील. आणि मला विश्वास आहे की मी यातूनही बाहेर पडेन. हे ११ दिवस खूप कठीण होते. पण, काही चांगली माणसं आजूबाजूला असल्यामुळे गोष्टी थोड्या सोप्या झाल्या. त्रास झाला पण कोकिलाबेन हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे गोष्टी सांभाळल्या", असं दीपिकाने म्हटलं आहे. 

पुढे ती म्हणते, "डॉ. सोमनाथ चड्ढोपाध्याय आणि त्यांची टीम डॉ. कांचन, डॉ. नेहा, डॉ. संकेत, डॉ. मनेक आणि डॉ. कविता...ते फक्त उत्तम डॉक्टर नाहीत तर उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व आहेत. एवढ्या प्रेमाने आणि काळजीने एखाद्या रुग्णावर उपचार केले तर त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा दिसते आणि त्याला हिंमतही मिळते. त्यासोबतच सिस्टर्स, स्टाफ ज्यांनी माझी काळजी घेतली मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. हे तुमचं प्रेम आणि तुम्ही घेतलेल्या काळजीमुळेच मी बरी होऊन लवकर घरी जात आहे. त्यासोबतच तुम्हा सगळ्यांचं प्रेम, तुम्ही माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना आणि तुमचे आशीर्वाद ही माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. तुमच्या प्रेमामुळे मला खूप हिंमत मिळाली. माझे पुढचे उपचारही असेच व्यवस्थित होऊ दे आणि यात मला हिंमत मिळू दे यासाठी प्रार्थना करा. तुम्हा सगळ्यांना खूप सारं प्रेम". 

टॅग्स :दीपिका कक्करटिव्ही कलाकार