'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्री दीपिका कक्करला (Deepika Kakar) लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. दोन दिवसांपूर्वीच तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया. १४ तास ही सर्जरी चालली. यानंतर आता दीपिकाचा पती शोएबने तिची हेल्थ अपडेट दिली आहे. तसंच त्याने व्हिडिओमध्ये दीपिकालाही दाखवलं आहे. शोएब सुरुवातीपासूनच दीपिकाबद्दल आपल्या युट्यूब व्लॉगमधून अपडेट देत होता. आता इतक्या दिवसांनी स्वत: दीपिका समोर आली आहे.
शोएब इब्राहिम युट्यूबवर व्हिडिओ शेअर करत म्हणाला, "आता दीपिकाच्या तब्येतीत आधीपेक्षा सुधारणा आहे. ती थोडं थोडं खायला प्यायला लागली आहे." यानंतर तो दीपिकासमोर कॅमेरा नेतो. दीपिका रडायला लागते. ती म्हणते, "सांगण्यासारखं काही नाहीए. सर्जरीनंतर मी खूप भावुक झाले आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर मला रडू येत आहे. आधीही मी भावनिक होतेच आता आणखी जास्त झाले आहे. तुम्हा सगळ्यांशी मी आरामात नंतर बोलेन. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली त्यासाठी खूप आभार. रुग्णालयातही लोक मला म्हणायचे की मॅम तुम्ही लवकर बरे व्हाल. इतर रुग्णांचे नातेवाईकही मला धीर देत होते. मला खोकलाही झाला होता. त्यामुळे टाके आणखी दुखायचे. बाकी सगळं ठीक आहे. नंतर सविस्तर बोलेनच."
यानंतर शोएबही सर्वांचे आभार मानत म्हणाला "अनेकांनी या कठीण काळात आमची मदत केली. माझ्या घरातील मदतनीस तर घरीच गेलेले नाहीत. आईचीही खूप मदत झाली. सगळ्यांनी रुहानची काळजी घेतली."
शेवटी व्हिडिओत दीपिका आणि शोएब दोघांची आई येते. ते रुहानलाही सोबत आणतात. रुहानला पाहून दीपिका खूश होते. व्हिडिओत रुहान दीपिकासोबत खेळताना दिसत आहे.