Join us

वडिलांच्या कडेवर असलेल्या या चिमुकलीला ओखळलंत का?, आज आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 16:01 IST

वडिलांच्या कडेवर असलेल्या या मुलीला ओळखलंत का, ही चिमुकली आज टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा आहे.

सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यामुळे ही सेलिब्रिटी मंडळी अनेकदा त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्येच मध्यंतरी अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या बालपणीचे किंवा कॉलेज जीवनातील फोटो शेअर करत नवा ट्रेंड सुरु केला होता. यामध्येच आता एका लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो चर्चेत येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एका अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिसत असलेली चिमुकली अभिनेत्री गिरिजा प्रभू आहे.फोटोत गिरीजा वडिलांच्या कडेवर दिसतेय. 

सध्या गिरिजा सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत गौरीची भूमिका साकरते आहे. कौल मनाचा, काय झालं कळंना , सेंट मेरी मराठी मिडीयम, डॅड चिअर्स , तुझा दुरावा हे तिचे काही गाजलेले चित्रपट. याबरोबरच तिने मालिकांमध्ये छोट्या छोट्या  भूमिका आणि एक शॉर्ट फिल्म सुद्धा केली आहे. गिरीजाने ‘टाइम प्लीज’ या सिनेमात चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलेलं. अभिनयाबरोबरच तिला नृत्याची पण आवड आहे. ‘युवा डान्सिंग क्वीन’ या रिअ‍ॅलिटी शो मध्ये तिने भाग घेतला होता. 

टॅग्स :टिव्ही कलाकार