Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोटोत दिसणारी ही चिमुरडी आज आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा, ओळखा पाहू कोण आहे ती ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 07:00 IST

भूमिकेत जीव ओतून काम करणं आणि वेगळी ओळख निर्माण करणं, ही तिच्या अभिनयाची खासियत आहे.

आपल्या आवडत्या सेलिब्रेटींचे लहानपणीचे फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे अनेकवेळा सोशल मीडियावर सेलिब्रेटींचे लहानपणीच् फोटो व्हायरल होत असतात. अशाच एका मराठी अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो समोर आला आहे. नुकत्याच या अभिनेत्रीचे लेक माझी दुर्गा मालिकेत एंट्री आहे. हा फोटो  अभिनेत्री रश्मी अनपटचा आहे. रश्मी फोटोत आईच्या कडेवर बसलेली दिसतेय.

रश्मीने तिच्या करिअरची सुरुवात नाटकापासून केली. स्वभावाला औषध नाही. गाठीभेटी या नाटकांमध्ये तिने काम केले. यानंतर ती सुवासिनी मालिकेत झळकली होती. 'पुढचं पाऊल,' ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘फ्रेशर्स’, ‘कुलस्वामिनी’ या मालिकांमध्ये रश्मीने काम केले. कुलस्वामिनी' या मालिकेमुळे रश्मीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. रश्मीचा पती अमित खेडेकर हा देखील अभिनेता आहे. अमित हा देखील अभिनेता असून त्याने हृदयांतर, हिरकणी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.

लेक माझी दुर्गा मालिकेत रश्मी रश्मी दुर्गाची भूमिकेत दिसतेय. अभिनेत्री वरदा पाटीलने ही भूमिका सोडल्यानंतर मालिकेत रश्मीची एंट्री झाली आहे. रश्मी अनपट मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.याआधी तिने आई माझी काळुबाई मालिकेत आर्याची भूमिका साकारली होती.  रश्मी सोशल मीडियाच्या माध्यामातून फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करत असते.

 

टॅग्स :टिव्ही कलाकार