Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत होणार या लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 14:17 IST

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत आता एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. यामुळे यश आणि नेहाच्या नात्यावर काही परिणाम होईल का?,

छोट्या पडद्यावरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत यशस्वी घोडदौड करत आहे. यश आणि नेहा यांच्या नात्यात सुरुवातीपासून अनेक चढउतार आल्याचं साऱ्यांनीच पाहिलं आहे. अनेक अडथळे पार केल्यानंतर या दोघांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली होती. मात्र, आता ही लव्हस्टोरी खुलत असतानाच आजोबा अचानकपणे आजारी पडल्यामुळे त्यांच्या नात्याला पुन्हा एक नवं वळण मिळालं आहे. विशेष म्हणजे आता नेहा लग्न न करताच यशच्या घरी गेली आहे.

आता या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. अभिनेत्री सानिका बनारसवाले जोशीची एंट्री होणार आहे. सानिकाने स्वाभिमान, स्वामिनी या मालिकेतील काम केलं आहे.  स्वामिनी मालिकेत साकारलेली जानकीबाई यांची भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. या मालिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घऱाघरात पोहचली.

 नकळत सारे घडले या मालिकेत तिनं साकारलेली स्वातीची भूमिकाही गाजली होती. सानिकाने ‘स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ ही मालिका देखील काही दिवसापूर्वी सोडली होती.  त्यावेळेस तिनं लग्नासाठी ही मालिका सोडल्याची चर्चा होती. सानिकाने डिसेंबर 2021मध्ये ऋषभ कठारिया याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता सानिकाच्या एंट्रीमुळे मालिकेत काय नवीन वळण येणार हे आपल्याला लवकरच कळले. सानिकाच्या येण्याचा परिणाम यश आणि नेहाच्या नात्यावर होईल का या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळतील. 

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठी