Join us
Daily Top 2Weekly Top 5

समिधा गुरूची सख्खी मोठी बहीण आहे मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 13:39 IST

आज अनेक सेलिब्रिटी बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत.

मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. आपल्या बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमधून ह्या कलाकार बहिणी आपले स्थान निर्माण करत आहेत. आज अनेक सेलिब्रिटी बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. पण कदाचित रसिकांनाच खऱ्या आयुष्यात या अभिनेत्रींच्या सख्या बहिणी फारशा ठाऊक नसतील. आज अशाच एक इंडस्ट्रीतील बहिणींच्या जोडीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

अभिनेत्री समधी गुरु हीच सख्खी बहीण सुद्धा अभिनेत्री आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देशपांडे ही समिधा गुरूची बहिण आहे. मृणाल देशपांडेने अनेक मालिकेत काम केले आहे. पुढचं पाऊल मालिकेतून ती घराघरात पोहचली. बावरा दिल या हिंदी मालिकेत काम करताना दिसली आहे. छत्रीवाली मालिकेतही तिने काम केले आहे. याशिवाय आणखी काही मालिकेत ती झळकली आहे.

समीधा गुरू हिने 'कापूस कोंड्याची गोष्ट', 'कायद्याचं बोला', 'लाल इश्क' यांसारखे उत्तोमोत्तम चित्रपट.. 'गेट वेल सून', 'तळ्यात-मळ्यात' ही दर्जेदार नाटकं तर 'अवघाचि सांसार', 'कमला', 'क्राईम पेट्रोल', 'जिवलगा' या आणि अशा अनेक मालिकेत काम केले आहे. अभिजीत गुरू हा समीधाचा नवरा असून त्याने दूरचिवाहिन्यांवर गाजलेल्या विविध मराठी मालिकांचे संवाद आणि पटकथा लिहिल्या आहेत. तो एक चांगला अभिनेता असण्यासोबतच एक खूप चांगला लेखक आहे.

टॅग्स :समिधा गुरूटिव्ही कलाकार