Join us

'मन उडू उडू झालं' फेम पूर्णिमा तळवळकरची सख्खी बहीण आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 07:00 IST

सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. आपल्या बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमधून ह्या कलाकार बहिणी आपले स्थान निर्माण करत आहेत.

मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. आपल्या बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमधून ह्या कलाकार बहिणी आपले स्थान निर्माण करत आहेत. आज अनेक सेलिब्रिटी बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. पण कदाचित रसिकांनाच खऱ्या आयुष्यात या अभिनेत्रींच्या सख्या बहिणी फारशा ठाऊक नसतील. आज अशाच एक इंडस्ट्रीतील बहिणींच्या जोडीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे मन उडू उडू झालं. आतापर्यंत या मालिकेचे अनेक भाग झाले असून प्रत्येक भागात एक नवी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेत इंद्राच्या आईची भूमिका अभिनेत्री पौर्णिमा तळवकळकर साकारत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का पूर्णिमा तळवळकर यांची सख्खी बहीणसुद्धा अभिनेत्री आहे. अभिनेत्री पल्लवी वैद्य पूर्णिमा तळवळकर यांची सख्खी बहीण आहे. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत पल्लवीने साकारलेली पुतळा राणीसाहेबांची भूमिका लक्षवेधी ठरली.

पल्लवी अनेक मराठी चित्रपटांतही ती झळकली आहे. गर्भ, झाले मोकळे आकाश या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. पल्लवीने ‘अगंबाई अरेच्चा!’ या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. या चित्रपटातून ती संजय नार्वेकर यांच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती. 

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठी