Join us

"त्याला भीती वाटते की, मी जर तोंड उघडलं तर..." युजवेंद्र चहलबद्दल काय म्हणाली धनश्री वर्मा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:45 IST

युझवेंद्र चहलला धोका दिला? धनश्री म्हणाली "मी खरे सांगितले तर..."

क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट खूप चर्चेत राहिला. लग्नानंतर ४ वर्षातच त्यांचा संसार मोडला. घटस्फोटानंतर धनश्रीला बराच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. दोघांच्या घटस्फोटाचे नेमके कारण काय, हे दोघांनीही सांगितले नाही.सध्या धनश्री वर्मा हिने Rise and Fall या शोमध्ये सहभागी झाली आहे. यामध्ये सहकलाकार स्पर्धकांशी संवाद साधत असताना तिनं घटस्फोट आणि त्याभोवतीच्या अफवांवर अतिशय रोखठोक शब्दांत मांडली.

Rise and Fall या शोमध्ये एका सहकलाकारानं धनश्री वर्माला थेट विचारलं की तिनं "चहलला धोका दिलाय का?". यावर उत्तर देताना ती म्हणाली, "तो अशाच वाईट गोष्टी पसरवेल. त्याला भीती आहे की जर मी तोंड उघडले तर सर्वकाही बाहेर येईल. जर मी तुम्हाला खरे सांगितले तर हा शो देखील तुम्हाला क्षुल्लक वाटेल". घटस्फोटानंतरही चहलप्रती सन्मान ठेवल्याचं तिनं स्पष्ट केलं.

धनश्री म्हणाली, "नात्यात परस्पर आदर महत्त्वाचा असतो. मी इच्छित असल्यास त्याला निराश करू शकले असते, पण मी नेहमीच त्याचा आदर केला, कारण तो माझा पती होता. आजही, मला त्या नात्याची प्रतिष्ठा समजते". दरम्यान, धनश्री आणि चहल २०२० मध्ये भेटले आणि त्याच वर्षी त्यांचे लग्न झाले. पण, २०२३ मध्ये त्यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्या आल्या आणि अखेर फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांचा घटस्फोट अधिकृत झाला.

टॅग्स :युजवेंद्र चहलटिव्ही कलाकार