Dhanashree Verma: क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या संसारात मिठाचा खडा पडला असून लवकरच त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.दोघांनीही इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. क्रिकेटपटूने त्याच्या इंस्टाग्रामवरून धनश्रीसोबतचे सर्व फोटोही डिलीट केले. दोघे घटस्फोट घेणार की नाही, हे दोघांनी स्पष्ट केलेले नाही. पण, या चर्चांमध्ये आता धनश्री वर्मा हिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इन्स्टाग्रामवर तिनं एक पोस्ट केली आहे.
धनश्रीनं एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती मातीची भांडी बनवण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. व्हिडीओमध्ये धनश्री म्हणते, "तर मी काहीतरी मनोरंजक, काहीतरी खास, काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या मित्रांनी मला हे सुचवलं आहे. तर मी माझ्या पहिल्या 'मृत्पात्री' (Pottery) वर्गासाठी आली आहे". तर तिनं व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "तुमचं नशीब स्वतः घडवा, एका वेळी एक पाऊल. माझी पहिली पॉटरी क्लास आणि मी आनंदी आहे, की तो इतका चांगला झाला. नक्कीच प्रयत्न करायला हवा". तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरुन कमेंट केल्यात. काहींनी तिला हा एक चांगला प्रयत्न असल्याचं म्हटलं. मात्र, काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
आता घटस्फोटाच्या चर्चांमध्ये धनश्री वर्मा ही आपल्या कामावर लक्ष केंद्रित करताना दिसतंय. तिने काही दिवसांपूर्वीच तिच्या चित्रपटाचे शूटिंग केले. धनश्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी धनश्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नेटकरी देखील धनश्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.