Join us

"निक्की-अरबाजचे फालतु चाळे, अश्लील हरकती...", 'बिग बॉस मराठी'बद्दल धनंजय पोवारची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 18:37 IST

धनंजय पोवारने एक  पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अरबाज आणि निक्की यांच्यावर भाष्य करणारी आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातील सदस्य सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांचे प्रत्येक फोटो, व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच धनंजय पोवारने एक  पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अरबाज आणि निक्की यांच्यावर भाष्य करणारी आहे.  नेमकी ही पोस्ट कोणी लिहली आणि यात काय म्हटलं आहे? जाणून घ्या.

धनंजय पोवार याने एका चाहत्याने केलेली कमेंट आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केली आहे. ही पोस्ट त्याने अंकिता वालावलकर, योगिता चव्हाण, सूरज चव्हाण, पंढरीनाथ कांबळे आणि आर्या जाधव यांना टॅग केली. पोस्टमध्ये चाहत्याने लिहलं, "निक्की-अरबाजच्या फेक नात्यातील खोटे इमोशन्स, फालतु चाळे, अश्लील हरकती यांना अवास्तव फुटेज देण्यापेक्षा नात्यातील खऱ्या प्रेमाच्या, भावनांच्या क्षणांना जरा जास्त फुटेज द्या. BB!"

पुढे लिहलं, "तुमचा शो पहिल्यांदाच घराघरांतील लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांनी सर्वाधिक वेळा पाहिला तो याच डीपी, अंकिता, सुरज, पॅडी दादा अशा मराठी मातीतल्या सामान्य आणि खऱ्या स्पर्धकांमुळे! कारण, ही माणसं सर्वांनाच आपल्या घरातली वाटतात. लोक TV कडे डोळे लावून बसतात ते असे खरे क्षण पाहण्यासाठी'. चांगल्या गोष्टी तुम्ही पडद्यावर आणतच नाही. नात्यातील गोडवा दाखवणारा हा क्षण दाखवण्यासाठी तुमच्याकडे एक – दोन मिनिटेही वेळ नव्हता? इतकी घाई? तुम्हाला मात्र निक्की-अरबाजचे फालतु चाळे तासभर दाखवून त्यातून नक्की कोणता संदेश द्यायचा आहे?".

टॅग्स :बिग बॉस मराठी