Devoleena Bhattacharjee Slams Dhruv Rathee : बांगलादेशामध्ये सुरू असलेल्या हिंसा, जाळपोळ आणि अराजकतेदरम्यान हिंदू युवक दीपू चंद्र दास (Dipu Das) याच्या निर्घृण हत्येने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. ईशनिंदेच्या आरोपाखाली (Blasphemy Violence) जमावाने दीपू दास याला मारहाण करून ठार केलं आणि नंतर मृतदेह जाळल्याची घटना घडली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेनंतर बांगलादेशातील अल्पसंख्याक समूदायात संतापाची लाट उसळली असून, भारतातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याच मुद्द्यावरून आता मनोरंजन विश्वातील कलाकारही आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी टीव्हीची 'गोपी बहू' म्हणजेच अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य हिने प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याच्यावर जोरदार टीका केली आहे.
देवोलीना भट्टाचार्य हिने ध्रुव राठीच्या एका ट्विटला उत्तर देताना त्याच्यावर निशाणा साधला. ध्रुव राठी सध्या 'धुरंधर' चित्रपटावर सतत टीका करत आहे. यावरून देवोलीना म्हणाली, "म्हणूनच मी तुझे घाणेरडे व्हिडीओ आणि ट्विट टाळण्याचा प्रयत्न करते. तू 'धुरंधर'बद्दल विचार करणं कधी थांबवशील आणि बांगलादेशातील हिंदूंसाठी कधी बोलशील? तू मोठमोठी षड्यंत्र रचणे कधी थांबवणार?", असं तिनं म्हटलं.
केवळ देवोलीनाच नाही, तर प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आणि 'लॉक अप' व 'बिग बॉस १७' चा विजेता मुनव्वर फारूकीनेही या क्रूरतेचा निषेध केला आहे. त्याने ट्विट केलं की, "बांगलादेशातील लिंचिंगचे व्हिडीओ पाहून मला खूप वाईट वाटत आहे. हे लोक क्रूर आहेत आणि जग शांतपणे पाहत आहे. आपण बोलले पाहिजे आणि गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे".
देवोलीनाने घेतलेल्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. अनेक चाहत्यांनी देवोलीनाचे समर्थन करत तिला 'सत्यासाठी उभी राहणारी धाडसी महिला' म्हटले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला अनेक नेटकऱ्यांनी ध्रुव राठीची बाजू घेत देवोलीनावरच प्रश्नांचा भडिमार केला आहे.
Web Summary : Actress Devoleena Bhattacharjee criticizes YouTuber Dhruv Rathee for ignoring the murder of a Hindu man, Dipu Das, in Bangladesh. Other celebrities like Munawar Faruqui have also condemned the violence, sparking mixed reactions online.
Web Summary : बांग्लादेश में एक हिंदू युवक, दीपू दास की हत्या पर अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ने यूट्यूबर ध्रुव राठी की आलोचना की। मुनव्वर फारुकी जैसे अन्य हस्तियों ने भी हिंसा की निंदा की, जिसके बाद ऑनलाइन प्रतिक्रियाएं सामने आईं।