Join us

लेहेंग्यात चालताना देवोलिनाची उडाली तारांबळ, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "असे ड्रेस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 16:53 IST

आरती सिंहच्या संगीत सोहळ्यातील देवोलिनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आरती सिंह लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आरतीच्या घरी लगीनघाई सुरू आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून नुकतंच संगीत सेरेमनी सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्याला कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीही या संगीत सोहळ्याला उपस्थित होती. आरती सिंहच्या संगीत सोहळ्यातील देवोलिनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

या संगीत सेरेमनीसाठी देवोलिनाने खास गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. डिझायनर भरजरी लेहेंग्यात देवोलिनाचं सौंदर्य आणखीन खुलून आलं होतं. पण, हा लेहेंगा सांभाळताना मात्र देवोलिनाची दमछाक झालेली पाहायला मिळाली. लेहेंग्यात चालताना देवोलिनाची तारांबळ उडाली होती. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन देवोलिनाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी देवोलिनाला ट्रोल केलं आहे. 

"कम्फर्टेबल ड्रेस घालत जा", "असे ड्रेस घालतच जाऊ नका ना", "उर्फीकडूनच शिवून घेतला असता" असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. देवोलिनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

टॅग्स :देवोलिना भट्टाचार्जीसेलिब्रिटी