Join us

नाद करायचा नाय आमच्या ताई साहेबांचा...! नेटकरी पडले ‘देवमाणूस’मधील चंदाच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 14:57 IST

Devmanus : देवी सिंगला आव्हान देणारी चंदा काही दिवसांतच तुफान लोकप्रिय झाली आहे. माधुरी पवार हिने ही चंदा साकारली आहे. 

ठळक मुद्दे माधुरी पवारने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत नंदिता वहिनींची भूमिका साकारली होती.

देवमाणूस (Devmanus) ही छोट्या पडद्यावरची मालिका सध्या एका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. साहजिकच सोशल मीडियावर मालिकेची चांगलीच चर्चा आहे. आता या मालिकेतील एक पात्र सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. होय, ती म्हणजे चंदा. देवी सिंगला आव्हान देणारी चंदा काही दिवसांतच तुफान लोकप्रिय झाली आहे. माधुरी पवार (Madhuri Pawar) हिने ही चंदा साकारली आहे. नुकताच  ‘देवमाणूस’चा प्रोमो रिलीज झाला. हा नवा प्रोमो आणि यात चंदाचा ठसकेबाज अंदाज पाहून सोशल मीडियावर नेटकºयांच्या कमेंट्सचा जणू पाऊस पडतोय.

चंदा कुणाचीच उधारी बाकी ठेवत नाही. सगळं वसूल करते व्याजासकट. मग तो देव असु दे नाहीतर माणूस, असं म्हणणा-या चंदा उर्फ चंदीच्या नेटकरी अक्षरश: प्रेमात पडले आहेत.

अनेकांना गंडवणारा  देवी सिंग या चंदीला घाबरला आहे. स्वप्नातही त्याला तीच दिसतेय. हे पाहून चाहते भन्नाट प्रतिक्रिया देत आहे. नाद करायचा नाय आमच्या ताई साहेबांचा, आमचा नाद लय बाद, अशा भन्नाट कमेंट्स चाहत्यांनी केल्या. माधुरी पवारने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत नंदिता वहिनींची भूमिका साकारली होती. आधी ही भूमिका धनश्री काडगावकरने साकारली होती. पण तिने मालिकेला रामराम ठोकल्यावर माधुरीने नंदिता वहिनीच्या भूमिकेत मालिकेत दमदार एंट्री घेतली होती. धनश्री काडगावकरने मालिकेला गुडबाय म्हटल्याने ही भूमिका माधुरीकडे आली. या पात्राचं वेगळेपण जपत माधुरी देखील प्रेक्षकांच्या मनात आणि घराघरांत पोहोचली. आता ती ‘देवमाणूस’ या मालिकेत चंदाच्या भूमिकेत झळकत आहे.

टॅग्स :झी मराठीटेलिव्हिजन