Join us

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’च्या मंचावर दीपा-कार्तिकची अशी झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 20:06 IST

बच्चेकंपनीच्या या सुरेल मैफलीत आनंदाचे रंग भरण्यासाठी हजेरी लावली ती ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा-कार्तिक आणि चिमुकल्या दीपिका आणि कार्तिकीने

स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. छोट्या उस्तादांचा आत्मविश्वास आणि उत्साह जजेसनाही थक्क करुन टाकतो आहे. बच्चेकंपनीच्या या सुरेल मैफलीत आनंदाचे रंग भरण्यासाठी हजेरी लावली ती ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा-कार्तिक आणि चिमुकल्या दीपिका आणि कार्तिकीने. या खास पाहुण्यांच्या हजेरीने सेटवरही नवा उत्साह संचारला होता. या धमाल एपिसोडमध्ये दीपिका आणि कार्तिकीने सेटवरचे काही भन्नाट किस्से शेअर केले. दीपा आणि कार्तिक यांच्यामध्ये सेटवर सर्वात उशिरा कोण येतं? सर्वात जास्त रिटेक कोण घेतं? सेटवर सर्वात जास्त फोनमध्ये कोण गुंग असतं? अश्या अनेक गोष्टींचं पोलखोल करत त्यांनी सेटवर धमाल उडवून दिली. सेटवर पडद्यामागे नेमकं काय घडतं हे जाणून घ्यायची प्रत्येकालाच उत्सुकता असते. त्यामुळे दीपिका-कार्तिकीसोबतचा हा खेळ सर्वांनीच मनापासून एन्जॉय केला.या खास भागाची झलक येत्या शनिवारी म्हणजेच 18 आणि 19 डिसेंबरला पाहायला मिळणार आहे.

याआधी दीपा आणि कार्तिकाचा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ  रेश्मा शिंदेने तिच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत रेश्मा सायशाचे लाड करताना दिसत होती. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळाली होती. . 

टॅग्स :रेश्मा शिंदे