Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या मुलीला घेऊन Debina Bonnerjeeला सतावतेय चिंता, म्हणाली- भीती वाटते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 18:42 IST

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी दुसऱ्यांदा आई झाली आहे.

Debina Bonnerjee On Her Second Baby: टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी दुसऱ्यांदा आई झाल्यामुळे खूप आनंदी आहे. बाळाचा जन्म वेळे आधीच झाल्यानं अभिनेत्री काहीशी घाबरलेली होती. काही कॉम्पलिकेशनमुळे  अभिनेत्रीची प्रिमेच्योर डिलिव्हरी करण्यात आली. एका मुलाखतीत अभिनेत्रीने यावर मोकळेपणाने सांगितलं आहे. 

देबिना बॅनर्जीने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, प्रेग्नेंसीचा सुरुवातीचा काळ खूप अवघड नव्हता. मात्र डिलिव्हरी दरम्यान काही अडचणी आल्या. अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा तिने पहिल्यांदा तिच्या बाळाला आपल्या कुशीत घेतले तेव्हा आनंदापेक्षा ती जास्त काळजीत होती.

अभिनेत्री म्हणाली, “जेव्हा मी तिला पहिल्यांदा पकडले तेव्हा मला काळजी वाटू लागली कारण ऑपरेशन थिएटरमध्ये बरेच काही घडत होते. मी खूप अस्वस्थ झाले होते. मला फक्त काळजी वाटत होती की ती ठीक आहे की नाही. 

देबिनाने सांगितले की, “पहिल्या बाळाच्या जन्मानंतर तिने ब्रेस्ट फिडिंग केलं नाही, परंतु दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर लगेचच तिच्या शरीरात दूध तयार होऊ लागले. हे माझ्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हते. हा माझ्यासाठी एक सुंदर अनुभव आहे. हा अनुभव मला खूप दिवसांपासून घ्यायचा होता. 

देबिना बॅनर्जीने अद्याप तिच्या दुसऱ्या मुलीचे नाव जाहीर केलेले नाही. अभिनेत्री म्हणते की 50 नावांपैकी तिने एक नाव निवडले आहे आणि ती लवकरच तिच्या मुलीचे नाव सांगेल.  सध्या ती फक्त तिच्या मुलीची काळजी घेत आहे कारण ती खूप लहान आणि नाजूक आहे. 

 

टॅग्स :टिव्ही कलाकार