Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठसकेबाज लावणी करणारी गौतमी पाटील आता महाराष्ट्राला दाखवणार पाककौशल्य, 'या' कार्यक्रमात दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:38 IST

नृत्यकौशल्य दाखवणारी गौतमी पाटील आता पाककौशल्य दाखवून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावण्यास सज्ज आहे (gautami patil)

सबसे कातील नावाने महाराष्ट्रात ओळख असणारी नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील. आपल्या ठसकेबाज लावणीने गौतमीने (gautami patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. गौतमी पाटील आता छोटा पडदा गाजवण्यासाठीही सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा सहभागी दिसणार आहे. गौतमीचं नृत्यकौशल्य संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतच आहे. 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमातून गौतमीचं पाककौशल्य पाहायला मिळणार आहे.

गौतमी पाटीलचं पाककौशल्य पाहण्यासाठी महाराष्ट्राला उत्सुकता

गौतमी पाटील 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार आहे. या भन्नाट कार्यक्रमाविषयी सांगताना गौतमी म्हणाली, "स्टार प्रवाह वहिनी माझ्या अत्यंत जवळची आहे. या वाहिनीने मला नवी ओळख मिळवून दिलीय. अल्पवाधीतच या परिवाराने मला आपलसं करून घेतलं आहे. शिट्टी वाजली रे या कार्यक्रमातून माझं टीव्ही विश्वात पदार्पण होतंय असं म्हंटलं तरी चालेल. खरं सांगायचं तर मला जेवण बनवता येत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम माझ्यासाठी नवा प्रयोग असणार आहे. त्यामुळे नवनव्या कलाकारांसोबत माझी स्वयंपाक घराशी नव्याने ओळख होणार आहे", अशी भावना गौतमीने व्यक्त केली.

'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जाणार आहे. मात्र तो पदार्थ बनवताना कलाकारांची कशी तारांबळ उडते हे पहाणं मजेशीर ठरणार आहे. कारण कलाकारांचं कलाकौशल्य आपण मालिका, नाटक आणि सिनेमांमधून पहातच असतो. मात्र त्यांचं आजवर कधीही न पाहिलेलं पाककौशल्य 'शिट्टी वाजली रे'च्या मंचावरून पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर येणार आहे. लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा कार्यक्रम होस्ट करणार असून पूर्णब्रह्म या मराठी रेस्टॉरण्टच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडतील.  शिट्टी वाजली रे हा शो २६ एप्रिल पासून रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर बघायला मिळणार आहे.

टॅग्स :गौतमी पाटीलस्टार प्रवाहअमेय वाघ