टीव्ही क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर सध्या तिच्या 'नागिन ७' या सुपरनॅचरल मालिकेमुळे चर्चेत आहे. आतापर्यंत या शोचे ६ सीझन्स गाजले असून सातव्या सीझनचा प्रीमियर लवकरच होणार आहे. एकताने आपल्या नवीन नागिनचा चेहरा देखील सादर केला आहे. या शोबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. 'नागिन ७' मध्ये प्रियंका चाहर चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, अभिनेत्री डेझी शाह तिला रिप्लेस करणार आहे. आता खुद्द डेझी शाहने याबाबत खुलासा केला आहे.
'फिल्मीज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत डेझी शाहने तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. जेव्हा तिला प्रियंकाला रिप्लेस करण्याबाबत विचारण्यात आले, तेव्हा तिने अत्यंत स्पष्ट उत्तर दिले. तिने या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. डेझी म्हणाली, "मला या भूमिकेत फिट व्हावे लागेल. सध्या प्रियंका या रोलसाठी योग्य आहे, कारण एकताने तिची निवड केली आहे आणि हा तिचा शो आहे."
चाहत्यांच्या प्रतिक्रिया डेझी शाहच्या या वक्तव्यानंतर प्रियंका चाहर चौधरीचे चाहते खूप आनंदी झाले आहेत, तर डेझीच्या चाहत्यांची थोडी निराशा झाली आहे. याआधी अशीही चर्चा होती की, एकता कपूर या शोसाठी सुंबुल तौकीर आणि डेझी शाह यांचा विचार करत आहे, परंतु अधिकृतपणे प्रियंका चाहर चौधरीचे नाव समोर आले.
कधी सुरू होणार शो?नागिनच्या सहाव्या सीझननंतर चाहते गेल्या २ वर्षांपासून सातव्या सीझनची वाट पाहत आहेत. अखेर ही प्रतीक्षा संपली असून २७ डिसेंबर रोजी 'नागिन ७' चा प्रीमियर होणार आहे.
Web Summary : Daisy Shah clarified she won't replace Priyanka Chahar in 'Naagin 7'. She stated Priyanka is perfect for the role chosen by Ekta Kapoor. The show premieres December 27th after a two-year wait.
Web Summary : डेज़ी शाह ने स्पष्ट किया कि वह 'नागिन 7' में प्रियंका चाहर की जगह नहीं लेंगी। उन्होंने कहा कि प्रियंका एकता कपूर द्वारा चुनी गई भूमिका के लिए बिल्कुल सही हैं। दो साल के इंतजार के बाद शो का प्रीमियर 27 दिसंबर को होगा।