रोहित शेट्टी पुन्हा एकदा नव्या जोमात 'खतरों के खिलाड़ी'चे 9वे सिझन घेऊन येत आहे. गेल्या काही दिवसंपासून या नवव्या सिझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून या शोमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहिर झाली आहे.
काही दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेले जोडपे म्हणजेच कॉमेडिकिंग भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया हे दोघेही या शोमध्ये आपले कसब आजमवताना दिसणार आहेत.