Join us

तू चाल पुढं: चेहऱ्यावर आत्मविश्वास अन् लूकमध्ये कमालीचा बदल; अश्विनी दिसणार नव्या रुपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 18:15 IST

Deepa Chaudhari: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिपाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोवरुन आता मालिकेत आश्विनीचा नवा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं दिसून येत आहे.

अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'तू चाल पुढं'. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दिपा परब चौधरी (Deepa Chaudhari) हिने कित्येक वर्षानंतर कलाविश्वात पदार्पण केलं. विशेष म्हणजे तिची ही मालिका प्रचंड गाजली. एका साध्या गृहिणीची भूमिका साकारणाऱ्या दिपाने या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्यामुळे मालिकेतील आश्विनी आज घराघरात पोहोचली. आता या मालिकेत आश्विनी एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिपाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोवरुन आता मालिकेत आश्विनीचा नवा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं दिसून येत आहे. 'अश्विनीचा नवा लूक', असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, दिपाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने केस मोकळे सोडले असून तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची छाक दिसून येत आहे. त्यामुळे या पुढे मालिकेत प्रेक्षकांना नवीन आश्विनी पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी