Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता या राज्यात होतंय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 13:25 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सर्वांचे निखळ मनोरंजन करतो आहे.

सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सर्वांचे निखळ मनोरंजन करतो आहे. अल्पावधीत या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते आहे. तर या कार्यक्रमाचे परिक्षक आहेत सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक. आजच्या कठीण परिस्थितीत हा कार्यक्रम  प्रेक्षकांच्या टेन्शनवरची मात्रा ठरतो आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन झाल्यामुळे चित्रीकरण थांबले आहे, पण प्रेक्षकांचे मनोरंजन मात्र अबाधित राहिले आहे. प्रेक्षकांना फ्रेश एपिसोड्सची मेजवानी मिळतच होती आणि आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या हास्यजत्रेने राज्याबाहेर, दमणमध्ये चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. चित्रीकरणाची सुरुवात दणक्यात झाली आहे. ती सुरुवात संगीत कलाविश्वात मोठं नाव असलेले गायक-गीतकार अनु मलिक यांच्या कार्यक्रमातल्या हजेरीने! ३ आणि ४ मे रोजी सोनी मराठीवरील हास्यजत्रेमध्ये पाहुणे अनु मलिक प्रेक्षकांना पाहायला मिळतील. 

या वेळी अनु मलिकने सेटवर धमाल केली आणि  प्रसाद ओक याच्याबरोबर 'आम्ही ढोलकर' हे मराठी गाणंही  गायलं. 'आग लगा दी' असं म्हणून स्पर्धकांचं कौतुक करणाऱ्या अनु मलिकने हास्यजत्रेच्या स्पर्धकांचं कौतुक केलं आहे. 

टॅग्स :प्रसाद ओक प्राजक्ता माळीसोनी मराठी