Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉमेडीचा बादशाहा जॉनी लीवर दिसणार छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 08:00 IST

स्टार प्रवाह वाहिनी ‘एक टप्पा आऊट’ हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.

स्टार प्रवाह वाहिनी ‘एक टप्पा आऊट’ हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. कार्यक्रमाचे नाव जितके हटके आहे तितकीच शोची संकल्पना हटके असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अस्सल विनोदवीरांचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात दडलेल्या या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम कॉमेडीचा बादशाहा जॉनी लीवर आणि मराठीतले दोन दिग्गज कलाकार करणार आहेत. 

या कार्यक्रमाविषयी जॉनी लीवर म्हणाले, ‘ह्युमर आहे म्हणूनच त्या जागी जज म्हणून जॉनी लीवर आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने ‘एक टप्पा आऊट’च्या निमित्ताने नव्या टॅलेण्टसाठी खूप मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या अनोख्या संधीचा लाभ सर्वांनीच घ्यायला हवा. ‘एक टप्पा आऊट’मध्ये माझा सहभाग आहे याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून मला अभिमान आहे.’

‘सध्या जगाला हसण्याची आणि हसवण्याची गरज आहे. यासाठीच स्टार प्रवाह वाहिनी ‘एक टप्पा आऊट’ हा अनोखा स्टॅण्ड अप कॉमेडी शो घेऊन येत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या टॅलेण्टचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाईल. दिग्गज परीक्षक आणि सुप्रसिद्ध कलाकार मंडळींच्या सानिध्यात नवख्या कलाकारांना मार्गदर्शन केले जाईल. मनोरंजनाने परिपूर्ण असा हा कार्यक्रम असेल’ अशी भावना ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी व्यक्त केली.३ मार्चपासून ‘एक टप्पा आऊट’ च्या ऑडिशन्सना सुरुवात होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि रत्नागिरी येथे या ऑडिशन्स पार पडणार आहेत. या ऑडिशनबद्दलची माहिती लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरुन देण्यात येईल. तेव्हा मनोरंजनाची ही धमाल सफर अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. 

टॅग्स :जॉनी लिव्हरस्टार प्रवाह