Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! काम करण्यास नकार दिल्यामुळे आधी शिवीगाळ आणि मग अश्लील मेसेज, छवी पांडेचा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 13:00 IST

अभिनेत्री छवी पांडेने केला धक्कादायक खुलासा, वाचून व्हाल हैराण

एक बूंद इश्क आणि लेडीज स्पेशल मालिकेतील अभिनेत्री छवी पांडेने तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा धक्कादायक खुलासा केला आहे. तिने या घटनेचे व्हॉट्स अॅपवर स्क्रीन शॉट्स शेअर केले आहेत. 

छवी पांडेला काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपद्वारे एकाने कामासाठी संपर्क साधला होता. त्याने छवीला जाहिरातीत काम करण्याबाबत विचारणा केली. अभिनेत्रीने नकार दिल्यानंतर त्या व्यक्तीने मला शिवीगाळ चालू केली. इन्स्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट शेअर करत तिने ही गोष्ट उघडकीस आणली.

छवी पांडे हिने तिच्या पोस्टमध्ये सांगितले की, 'मला काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधला. एका उत्पादनाच्या जाहिरातीत मी त्याच्यासोबत काम करावी अशी त्याची इच्छा होती. मात्र मला त्यावेळी काहीतरी गडबड वाटली आणि मी नम्रपणे त्याला नकार दिला. यानंतर त्याने माझ्यासोबत गैरवर्तवणूक सुरू केली. त्याने मला शिवीगाळ सुरू केली. माझ्यासोबत अश्लील पद्धतीने बोलू लागला. मात्र त्याने नंतर मेसेज डिलीट केले. 

तसेच तिने सिनेइंडस्ट्रीमध्ये नुकतेच पाऊल ठेवलेल्या कलाकारांनाही सावधान केले. अशी लोक फक्त तुमचा वापर करून आपले काम करून घेतात, असेही ती म्हणाली.

तसेच यावेळी छवीने माझ्या मनाविरुद्ध कोणी मला वागण्यास भाग पाडू शकत नाही, असेही म्हटले.

टॅग्स :टेलिव्हिजन