वडापाव गर्ल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली चंद्रिका दीक्षित (chandrika dixit) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. तिच्या वैवाहिक जीवनात चढउतार येत असून तिचं नाव एका मिस्ट्री मॅनसोबत जोडलं जात आहे. विशेष म्हणजे चंद्रिका या मिस्ट्री मॅनसाठी तिच्या पतीला घटस्फोट देणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, या चर्चांमध्येच चंद्रिकाला तिच्या पतीची आठवण आली असून तिने एक व्हिडीओ सोशल मीडयावर शेअर केला आहे.
चंद्रिका ज्या मिस्ट्री मॅनमुळे चर्चेत येत आहे त्याचं नाव अनस सैफी असं आहे. चंद्रिकाने अनस आणि एका मिडेयटरसोबत व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने अनससोबत असलेल्या नात्यावर भाष्य केलं आहे. तसंच तिचा पती आणि धर्म परिवर्तनाविषयी होणाऱ्या चर्चांवरही मत मांडलं आहे.
काय म्हणाली चंद्रिका?
'' आम्ही कंटेट क्रिएटर आहोत त्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे रिल्स करावे लागतात. पण, याचा अर्थ असा नाही की लगेच हा माझा पती झाला किंवा आमचं अफेअर आहे. बसून चर्चा केली तर सगळे प्रश्न नक्कीच सुटू शकतात. माझा विश्वासघात झाला आहे. मी त्या दु:खात आहे.पण, याचा अर्थ असा नाही की सुद्धा लगेच विश्वासघात करेन,'' असं चंद्रिका म्हणाली.
पुढे ती म्हणते, ''सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी धर्म बदलला असं बोललं जात आहे. मात्र, मी कोणताही धर्म बदलेला नाही. मी अजूनही तीच ब्राह्मण चंद्रिका आहे.'' दरम्यान, चंद्रिकाने इन्स्टाग्रामवर अनससोबतचे अनेक रोमॅण्टिक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यांचे हे व्हिडीओ पाहून चंद्रिका आणि अनस एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. इतकंच नाही तर अनसमुळेच चंद्रिकाने पती युगम गेरा याच्यापासून विभक्त झाली असंही म्हटलं जाऊ लागलं.
Web Summary : Chandrika Dixit, facing marital issues, is linked to Anas Saifi. She denies conversion rumors, clarifying content creation doesn't imply relationships, amidst alleged betrayal.
Web Summary : वैवाहिक समस्याओं का सामना कर रही चंद्रिका दीक्षित का नाम अनस सैफी से जोड़ा जा रहा है। उन्होंने धर्म परिवर्तन की अफवाहों का खंडन किया और स्पष्ट किया कि कंटेंट बनाने का मतलब रिश्ते नहीं होता।