Join us

पाकिस्तानही आपल्यावर हसत असावा...! कविता कौशिकने केला कपिल शर्माचा बचाव!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 13:19 IST

कपिल शर्मा नवज्योत सिंग सिद्धूची पाठराखण करतोय, असे मानून लोकांनी कपिलला लक्ष्य करणे सुरु केलेय. अशात टीव्हीचा लोकप्रिय चेहरा कविता कौशिक कपिल शर्माच्या शोच्या बाजूने मैदानात उतरली आहे. 

ठळक मुद्देकाल-परवा कपिलने या संपूर्ण वादावर मौन सोडत, सिद्धूला शोमधून बाहेर काढणे, हा पर्याय नाही, अशी भूमिका घेतली आणि लोक पुन्हा संतापले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कपिल शर्माचा कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ लोकांच्या निशाण्यावर आहे. या शोवर परीक्षकाच्या भूमिकेत दिसणारा नवज्योत सिंग सिद्धू याच्या एका वक्तव्यामुळे लोक संतापले आहेत आणि यातूनच सिद्धूला हटवा, नाहीतर शो बंद पाडू, अशी लोकांची मागणी आहे. याच वादातून सोशल मीडियावर ‘बायकॉट कपिल शर्मा शो’असा हॅशटॅग ट्रेंड होतोय. त्यातच काल-परवा कपिलने या संपूर्ण वादावर मौन सोडत, सिद्धूला शोमधून बाहेर काढणे, हा पर्याय नाही, अशी भूमिका घेतली आणि लोक पुन्हा संतापले. कपिल शर्मा नवज्योत सिंग सिद्धूची पाठराखण करतोय, असे मानून लोकांनी कपिलला लक्ष्य करणे सुरु केले. अशात टीव्हीचा लोकप्रिय चेहरा कविता कौशिक कपिल शर्माच्या शोच्या बाजूने मैदानात उतरली आहे. 

‘ज्या कपिल शर्माने खासगी आयुष्यातील दु:ख पचवून लोकांना हसवले, आज त्याच्याच बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय. कपिल वादात सापडला तोपर्यंत तो कोट्यधीश बनला होता. पण त्याने संपूर्ण वाद अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत लग्न केले आणि पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी सज्ज झाला. कपिल काय म्हणतोय, ते जाणून घ्या. भारत आपल्या एका हिºयावर बहिष्कार टाकण्याची भाषा करतोय, हे पाहून पाकिस्तानही आपल्यावर हसत असावा. कपिल त्याच्या एका महत्त्वाच्या सहकाºयाला त्याच्या राजकीय विचारासाठी शो बाहेर काढू शकत नाही. कुठल्याही मोठ्या मुद्यावर निर्णय घेण्याचे काम आपल्या सरकारचे व लष्कराचे आहे, आपले नाही. आपण आपआपसात लढण्यात काहीही हशील नाही,’असे ट्वीट कविता कौशिकने केले आहे.

टॅग्स :कविता कौशिककपिल शर्मा नवज्योतसिंग सिद्धू