Join us

"एक नवी सुरुवात करतोय...", 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावरुन गौरव मोरेने शेअर केला पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 11:42 IST

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेनेदेखील 'चला हवा येऊ द्या'मध्ये एन्ट्री घेतली आहे. गौरव या नव्या पर्वात परिक्षक म्हणून दिसणार आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवरील फोटो शेअर करत गौरवने पोस्ट लिहिली आहे. 

'चला हवा येऊ द्या'चं नवं पर्व आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या पर्वात अनेक नवे चेहरे दिसणार आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेनेदेखील 'चला हवा येऊ द्या'मध्ये एन्ट्री घेतली आहे. गौरव या नव्या पर्वात परिक्षक म्हणून दिसणार आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवरील फोटो शेअर करत गौरवने पोस्ट लिहिली आहे. 

गौरवने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन खास पोस्ट शेअर केली आहे. "एक नवीन सुरुवात करतोय आशीर्वाद असु द्या. सोबत नवीन खेळाडु आहेत त्यांनाही आपल्या आशीर्वादाची गरज आहे", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. गौरवला 'चला हवा येऊ द्या'मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, 'चला हवा येऊ द्या'च्या या नव्या पर्वाचं सूत्रसंचलान अभिनेता अभिजीत खांडकेकर करणार आहे. तर या पर्वात काही नव्या चेहऱ्यांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळणार आहे. श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, प्रियदर्शन जाधव आणि गौरव मोरे हे 'चला हवा येऊ द्या'मध्ये परिक्षक असणार आहेत. शनिवार-रविवार रात्री ९.३० वाजता 'चला हवा येऊ द्या'चं नवं पर्व प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

टॅग्स :चला हवा येऊ द्याटिव्ही कलाकार