Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय; सुरु केला मिसळ व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 09:29 IST

Marathi actor: अलिकडेच या अभिनेत्याने एका मिसळ महोत्सवातही सहभाग घेतला होता. यावेळी मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर त्याने स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेल्या 'चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. हा शो संपल्यानंतर यातील अनेक कलाकार सध्या नवनवीन प्रोजेक्टमध्ये काम करतांना दिसत आहेत. मात्र, यातील एका कलाकाराने कोणताही प्रोजेक्ट न स्वीकारता थेट स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. 

'चला हवा येऊ द्या'फेम अभिनेता तुषार देवल याने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तुषारने बोरीवलीमध्ये स्वत:चं हॉटेल सुरु केलं असून या नव्या शाखेचं त्याने अलिकडेच उद्घाटन केलं आहे. तुषारने सोशल मीडियावर त्याच्या मिसळ हाऊसचा एक व्हिडीओ शेअर करत याविषयीची माहिती चाहत्यांना दिली आहे.

तुषारच्या या नव्या व्यवसायाचं उद्धटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते पार पडलं. काही दिवसांपूर्वीच तुषार आणि अभिनेत्री स्वाती देवल या जोडीने मिसळ महोत्सवात त्यांच्या मिसळचा स्टॉल लावला होता.'चला मिसळ खाऊया' असं त्याच्या स्टॉलचं नाव होतं. विशेष म्हणजे त्यांच्या या मिसळ स्टॉलला खवय्यांनी मोठा प्रतिसाध दिला. इतकंच नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भेट दिली होती. लोकांकडून मिळालेल्या या प्रतिसादानंतर तुषार आणि स्वाती यांनी एक पाऊल पुढे टाकत स्वत:चं हॉटेल सुरु केलं.

दरम्यान, मिसळ देवल असं त्याच्या नव्या मिसळ हाऊसचं नाव आहे. या संदर्भातील पोस्ट शेअर करत 'आज माझं अजून एक स्वप्नं पूर्ण झालं', असं कॅप्शन त्याने दिलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनचला हवा येऊ द्यासेलिब्रिटीमराठी अभिनेता