Join us

'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळे म्हणतोय "बोले तो झक्कास..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 17:09 IST

Chala Hawa Yeu Dya: येत्या आठवड्यात 'चला हवा येऊ द्याच्या मंचावर हिंदी चित्रपट 'जुग-जुग जियो' मधील कलाकार हजेरी लावणार आहेत.

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला  पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे की मराठी सोबत हिंदी कलाकारसुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात. येत्या आठवड्यात चला हवा येऊ द्याच्या मंचावर हिंदी चित्रपट जुग-जुग जियो मधील कलाकार म्हणजेच अभिनेता वरुण धवन, कियारा अडवाणी आणि अनिल कपूर प्रेक्षकांच्या भेटीस येतील. थुकरट वाडीत येण्यासाठी या कलाकारांनी चक्क मेट्रोतुन प्रवास केला. तसंच चला हवा येऊ द्याच्या मंचावर थुकरटवाडीतील विनोदवीरांनी कल्ला पाहून या कलाकारांना हसू आवरेना. मंचावर चाललेल्या धमाल मस्तीचे व्हिडिओज या कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावरून शेअर देखील केले. इतकंच नव्हे तर कसे आहेत मंडळी?, हसताय ना? असं विचारणारा डॉक्टर अनिल कपूरसोबत बोले तो झक्कास म्हणतोय.

डॉक्टर निलेश साबळेने अनिल कपूर यांच्यासोबतच एक सुंदर फोटो शेअर करून त्याला "बोले तो झक्कास..." असं कॅप्शन दिलंय. हा फोटो देखील एकदम झक्कास आला आहे हे त्या फोटोवर प्रेक्षकांनी केलेल्या कमेंट्स आणि लाईक्सच्या वर्षावावरून कळतंय. या भागातील सर्व धमाल मजा मस्ती पाहण्यासाठी बघायला विसरू नका चला हवा येऊ द्या सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर

टॅग्स :चला हवा येऊ द्याअनिल कपूर