Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अनेक प्रसंगी तुला सोडून....", 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेने पत्नीसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 13:45 IST

अंकुर वाढवेने पत्नीसाठी लिहिलेल्या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) शोमधून सर्व कलाकार घराघरात पोहचले आहेत. या शोमधून अभिनेता अंकुर वाढवे( Ankur Wadhave)ला देखील चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. नुकतंच त्याने त्याच्या पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

अंकुर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. विविध फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. कुटुंबासोबतचे खास फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. या सगळ्यात अंकुर वाढवेची पत्नीही लक्ष वेधून घेते. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त त्याने खास पोस्ट लिहिली आहे. 

अंकुरची पोस्ट प्रिय बायको, "व्यास्तातला व्यस्त ' वेळ ' तुझ्यासाठी झोपेची अर्धी झोप तुझ्यासाठी ओलांडली सीमा प्रेमाची तुझ्यासाठी माझा कण नी कण तुझ्यासाठी माझं मीपण तुझ्यासाठी आयुष काय आहे? त्यापेक्षा जे महत्वाचं ते तुझ्यासाठी."सतत कामात काम हेच परम धेय्य या वृत्तीचा मी आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून ते महत्वाच्या अनेक प्रसंगी तुला सोडून कामाला महत्व dile आहे त्याला तू तेवढंच समजून घेतलं. काल तुझा वाढदिवस schedule कॅन्सल झाल्याचा आनंद फक्त मला माहित आहे. म्हणूनच तुला सरप्राइज देण्यासाठी कोणाला काहीही न सांगता घरी आलो. तुला कुठेही फिरवू शकलो नाही पण काल आपण night out पुसद मध्ये मध्य रात्री घालवली (तुला आवडलं की नाही माहीत नाही पण मी ह्या कॉलेज मध्ये शिकलो! मी इथून पैदल steno च्या class ला जयायचो म्हणून) तुला बोर केलं. 

अंकुरच्या वाढवेच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटी आणि चाहते कमेंट्स केल्या आहेत.  ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनीसाहेब’, अशी कमेंट त्यांनी केली आहे.

दरम्यान  अंकुर अभिनेत्यासोबत उत्तम कवीदेखील आहे. त्याच्या पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्याने करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स आणि कन्हैया या नाटकात काम केले आहे. 

टॅग्स :चला हवा येऊ द्याटिव्ही कलाकार