Join us

'वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला अन्'; 'चला हवा येऊ द्या'फेम अभिनेता भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 17:32 IST

Yogesh shirsat: सध्या नेटकऱ्यांमध्ये या कार्यक्रमातील अभिनेता योगेश शिरसाट याची चर्चा रंगली आहे. त्याने त्याच्या वडिलांची एक आठवण शेअर केली आहे.

छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेला कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. आज लोकप्रिय शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमातील कलाकारही तितकीच फेमस आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगत असते. सध्या नेटकऱ्यांमध्ये या कार्यक्रमातील अभिनेता योगेश शिरसाट याची चर्चा रंगली आहे. त्याने त्याच्या वडिलांची एक आठवण शेअर केली आहे.

'चला हवा येऊ द्या'मध्ये आता कलाकारांसोबतच बालकलाकारही प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. या बालकलाकारांमध्ये योगेश शिरसाटचा लेक प्रख्यात शिरसाटदेखील आहे. त्यामुळे ‘चला हवा येऊ द्या – लहान तोंडी मोठा घास’मध्ये  अभिनेत्याच्या लेकाचाही अभिनय प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. याच विषयी बोलत असताना त्याने त्याच्या वडिलांची आठवण शेअर केली.

“तू ज्या मंचावर काम करतो त्याच मंचावर स्वतःच्या मुलाला पाहून कसं वाटतं?” , असा प्रश्न योगेशला विचारण्यात आला होता. यावर, “कोणत्याही वडिलांसाठी ही अभिमानाचीच गोष्ट असेल. माझा वडिलांचा एक अनुभव मी सांगतो. माझ्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर मी बाबांना एकदा ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर बोलावलं होतं. अर्धांगवायूमुळे त्यांच्या एका डोळ्यावर परिणाम झाला होता. पण, माझं शूट, इतर लोक माझं करत असलेलं कौतुक त्यांनी ऐकलं आणि त्यांचा डोळा पूर्वीसारखा झाला", असं योगेश म्हणाला.

पुढे म्हणतो, "हिच कलेची खरी ताकद असते. हिच ताकद माझ्या पुढच्या पिढीमध्ये येते याचा खरंच आनंद आहे. मला माझ्या मुलाला मंचावर बघताना अगदी गहिवरुन येतं”.  

टॅग्स :सेलिब्रिटीचला हवा येऊ द्याटेलिव्हिजन