Join us
Daily Top 2Weekly Top 5

Cezanne Khan : 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्यावर महिलेने केले गंभीर आरोप, अभिनेता म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 12:15 IST

कसौटी जिंदगी की मधील अनुराग बासूची भूमिकामुळे अभिनेता सिझेन खान घराघरात पोहोचला. सध्या सिझेन खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

Cezanne Khan On FIR: कसौटी जिंदगी की मधील अनुराग बासूची भूमिकामुळे अभिनेता सिझेन खान घराघरात पोहोचला. सध्या सिझेन खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. खरं तर, स्वत:ला अभिनेत्याची पत्नी म्हणवून घेणाऱ्या एका महिलेने त्याच्यावर अनेक आरोप केले आहेत. तसेच तिने सिझेन खान विरुद्ध पोलिस तक्रार केल्याचे सांगितले. तर अभिनेत्याने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.  महिलेने सिझेनवर लावले आरोप खरं तर, मीडिया रिपोर्टनुसार, आयशा पिरानी नावाच्या महिलेने सांगितले की ती सिझेनची पत्नी आहे. तिने मुलाखतीत  अभिनेत्याने तिची "फसवणूक" केली आणि यूएसचे ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी तिचा वापर केला. महिलेने असाही दावा केला आहे की तिने 7 जून रोजी सिझेन विरुद्ध FIR दाखल केली होती. 

दुसरीकडे, सिझेन खानने महिलेला वेड म्हणत सर्व आरोप फेटाळले. तो म्हणाले, "हे खरं नाही. तुम्ही काय बोलत आहात हे मलाही कळत नाही. एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. असे काही झालेल नाही."

सिझेननेही आपली पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला, कोणीही काहीही करू शकतो. तो म्हणाला, "माझ्यापर्यंत अद्याप काही आलेले नाही. ती वेडी  आहे. मला याविषयावर काही बोलायचे नाही."

महिलेने दावा केला आहे की, तिने 2015 मध्ये सिजेन खानशी लग्न केले होते, अभिनेत्याने हे लग्न सीक्रेट ठेवण्यास सांगितले होते, परंतु नंतर तिला घटस्फोटाच्या कागदावर फसवून सही करुन घेतल्या. एकता कपूरच्या टीव्ही शो 'कसौटी जिंदगी की' मध्ये अनुराग बासूची भूमिका साकारून सिझेन खान खूप लोकप्रियता मिळाली. श्वेता तिवारीसोबतची त्याची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. अभिनेता अलीकडे टीव्ही शो अपनापन: बदलते रिश्तों का बंधन मध्ये दिसला होता.

टॅग्स :टिव्ही कलाकार