Join us

निक्की तांबोळी, तेजस्वी प्रकाश की गौरव खन्ना, 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विजेता कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:28 IST

'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या विजेत्या स्पर्धकाचं नाव उघड झालं आहे.

'सेलिब्रिटी मास्टरशेफ' हा शो सध्या चर्चेत आहे.  जरी या कार्यक्रमाला टीआरपी यादीत स्थान मिळालं नसलं तरी तो प्रेक्षकांना तो खूप आवडतोय. या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.  हा कार्यक्रम आता अंतीम टप्प्यात पोहचला आहे. लवकरच 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' च्या पहिल्या सीझनचा विजेता घोषित केला जाणार आहे. विजेत्याचे नाव जाणून घेण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. अधिकृत माहिती समोर येण्याआधीच विजेत्या स्पर्धकाचं नाव उघड झालं आहे.

'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये टॉप ५ मध्ये स्थान मिळवणारे स्पर्धक तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash), गौरव खन्ना (Gaurav Khanna), निक्की तांबोळी (Nikki Tamboli), राजीव अदातिया (Rajiv Adatia) आणि फैजल शेख (Faisal Sheikh) आहेत. एवढेच नाही तर अलीकडेच त्याचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये ५ स्पर्धक सोनेरी अ‍ॅप्रन घालून शूटिंग करताना दिसले होते.  या ५ स्पर्धकांमध्ये विजेत्याचे नाव उघड झालं आहे. इंडिया फोरमच्या ताज्या अहवालानुसार, 'अनुपमा' फेम अभिनेता गौरव खन्ना यांनी सेलिब्रिटी मास्टरशेफचा किताब जिंकला आहे.  तर निक्कीला दुसरे आणि तेजस्वीला तिसरे स्थान मिळाले आहे. 

गौरव खन्ना याचा  'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मधील प्रवास खूप रोमांचक होता. त्याने शो जिंकल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.  तथापि, गौरवने हा शो जिंकला आहे याची अधिकृतपणे अद्याप पुष्टी झालेली नाही. यासाठी चाहत्यांना अंतिम फेरीची वाट पहावी लागेल. दरम्यान 'अनुपमा' आणि 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'नंतर आता गौरव खन्ना 'बिग बॉस १९' सहभागी होऊ शकतो, अशी चर्चा आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकारतेजस्वी प्रकाश