Join us

Sapna Choudhary : "हुंड्यात क्रेटा कार मागितली, मारहाण केली..."; सपना चौधरीच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 10:33 IST

Sapna Choudhary : सपना चौधरीच्या वहिणीने हा गुन्हा दाखल केला आहे. हुंड्यात क्रेटा कार मागितल्याचा देखील आरोप आहे.

हरियाणातील प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary), तिचा भाऊ कर्ण आणि आई यांच्याविरुद्ध पलवलच्या पोलीस ठाण्यात हुंडा, मारहाणीसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना चौधरीच्या वहिणीने हा गुन्हा दाखल केला आहे. हुंड्यात क्रेटा कार मागितल्याचा देखील आरोप आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आठवडा होऊन गेल्यानंतरही अटक करण्यात आलेली नाही.

पलवल येथील रहिवासी असलेल्या सपना चौधरीच्या वहिणीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2018 साली नजफगड दिल्ली येथील रहिवासी असलेल्या सपना चौधरीचा भाऊ कर्ण याच्याशी तिचा विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून तिचा हुंड्यासाठी छळ केला जात होता आणि अनेकवेळा तिच्यावर अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. पण मुलगी झाल्यावर सासरच्यांनी क्रेटा कार मागायला सुरुवात केली.

वडिलांनी तीन लाख रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने व कपडे दिले, मात्र तरीही सासरच्या लोकांची हुंड्याची मागणी पूर्ण झाली नाही. त्यांनी क्रेटा कार आणण्यासाठी महिलेचा छळ सुरू केला. 2020 मध्ये, 26 मे रोजी, तिच्या पतीने दारूच्या नशेत तिच्यावर अत्याचार केला आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. सुमारे सहा महिन्यांपूर्वी ती पलवल येथील वडिलांच्या घरी आली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार केली. 

याप्रकरणी पीडितेचा पती कर्ण, नणंद सपना चौधरी, आई नीलम यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. डीएसपी सतेंदर या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आरोप निश्चित झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात येईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :सपना चौधरीगुन्हेगारी