Join us

बिग बॉस मराठी २ : घरातील दोन खास मैत्रिणी आज लढणार एकमेकींच्या विरोधात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 13:58 IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिवानी सुर्वेची एन्ट्री झाली आहे. शिवानीच्या घरामध्ये येण्याने नेहा आणि माधवला आता थोडा धीर मिळाला आहे. 

ठळक मुद्देघराचा कॅप्टन बनणे हि खूप मोठी जबाबदारी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिवानी सुर्वेची एन्ट्री झाली आहे. शिवानीच्या घरामध्ये येण्याने नेहा आणि माधवला आता थोडा धीर मिळाला आहे. तर हिनाला काल रडू कोसळले ज्याप्रकारे माधव आणि सगळे तिच्याशी वागतात तिला घरामध्ये एकटे पडल्यासारखे वाटते... माधवने तिची माफी मागितली आणि तिच्यासोबत डान्स देखील केला. विकेंडच्या डावमध्ये रुपाली आणि वीणाची चांगलीच शाळा घेतली. यावरूनच वीणाने आपली खंत महेश मांजरेकरांजवळ व्यक्त केली, कारण वीणाला महेश मांजरेकर म्हणाले तू माझी फेव्हरेट सदस्य होती, आणि याच वाक्यामुळे ती खूप दुखावली गेली.

मागील आठवड्यामध्ये ज्याप्रकारे रुपाली आणि वीणा किशोरी शहाणे यांच्याशी वागल्या ते अत्यंत चुकीचे होते आणि शिव आणि वीणा घरामध्ये अजिबात खेळत नसून एकमेकांमागे त्यांचा वेळ जातो आहे हे प्रेक्षकांना देखील दिसते आहे, आणि त्यांचे हे वागणे निराशाजनक आहे. काल घरामधून कोणीच बाहेर पडले नाही. रुपाली आणि माधव डेंजर झोनमध्ये आले असे सांगितल्यावर वीणा आणि नेहाला जरा टेंशन आले होते खरे पण, महेश मांजरेकर यांनी जेंव्हा जाहीर केले कि, या आठवड्यात सगळे सेफ आहेत तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद झाला. आज घरामध्ये रुपाली आणि वीणामध्ये कॅप्टनसी टास्क रंगणार  आहे. घराचा कॅप्टन बनणे हि खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर कॅप्टन बनलेल्या सदस्याला आठवड्याची इम्युनिटी देखील मिळते.

 

त्यामुळे हा टास्क जिंकून कॅप्टन बनणे हे प्रत्येक सदस्यासाठी खूप महत्वाचे असते... आता या टास्कमध्ये रुपाली आणि वीणा मध्ये कोण जिंकणार हे बघणे रंजक असणार आहे. या कॅप्टनसी कार्यामध्ये आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी एका सदस्याला साष्टांग नमस्कार घालण्यासाठी तयार करायचे आहे. आता बघूया रुपाली आणि वीणाला कोणा कोणाचा पाठींबा मिळणार ? आणि कोण घराचा कॅप्टन होण्याचा मान पटकवणार ?

टॅग्स :बिग बॉस मराठी