Join us

"पण जर कोणी माझ्या डोक्यात गेले तर मी...", जान्हवी किल्लेकरने स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 17:09 IST

Bigg Boss Marathi Season 5 : छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी(Janhvi Killekar)ने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. जान्हवीच्या येण्याने घरात रोजचा ड्रामा पाहायला मिळतो आहे.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन(Bigg Boss Marathi Season 5)ला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून यावेळी वेगवेगळ्या स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी(Janhvi Killekar)ने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. जान्हवीच्या येण्याने घरात रोजचा ड्रामा पाहायला मिळतो आहे. जान्हवीने तिच्या बिग बॉसच्या प्रवासाबद्दल सांगितले की, माझी सुरुवात फार छोट्या गोष्टीपासून झाली आहे. मी माझ्या जीवनात खूप संघर्ष केला आहे. माझ्या आयुष्यात महाराष्ट्राची खलनायिका ही एक टॅगलाईन झाली आहे. मी आता हिरोईन वगैरे काही करूच शकत नाही. आता तुम्ही मला सगळे पाहाल की जान्हवी खऱ्या आयुष्यात कशी आहे ते. 

जान्हवीने सांगितले की, घरात फोन नसणार हे समजल्यावर मला थोडे आश्चर्यच वाटले. मला नाही माहित की आता १०० दिवस घरात काय करणार. माझी काय अवस्था होणार कारण.. मी कायम फोनवर असते. आता या सगळ्यापासून एका वेगळ्याच जगात जायचे आहे जिथे वेगवेगळ्या स्वभावाची माणसे भेटणार आहेत. त्यांना कसे डील करायचे ते समजणे कठीण आहे पण प्रवास मजेदार होईल.

जान्हवीने घरच्यांना सांगितले तेव्हा ती म्हणाली, "सगळ्यांना शॉक बसला. सगळे मला म्हणाले जमणार का तुला? पण माझे घरचे एकदम खुश आहेत, विशेषतः माझा मुलगा. माझा मुलगा मला म्हणाला जा आणि मजा कर." जान्हवी  पुढे म्हणाली, "मी घरात कसलेही प्लॅनिंग करून चालले नाही कारण आपण करतो एक आणि वास्तवात होत एक म्हणून मी काही तयारी केली नाही.  मी अतिशय शांत डोक्याने जात आहे. घरातल्यांसोबत मी अगदी छानपणे राहीन कारण मी खूप गुणी आहे. पण जर कोणी माझ्या डोक्यात गेले तर मी त्याला सोडणार नाही." 

टॅग्स :बिग बॉस मराठी