Join us
Daily Top 2Weekly Top 5

काळा रंग, तुटलेलं Heart; बिग बॉसने घराबाहेर काढल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 09:50 IST

बिग बॉस मराठीमधून आर्याला निक्कीवर हात उगारल्याने बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर आर्याने केलेली पहिली पोस्ट चर्चेत आहे

बिग बॉस मराठीची सध्या चांगलीच चर्चा आहे. खेळ सुरु होऊन आता आठ आठवडे उलटले आहेत. या आठ आठवड्यांमध्ये वेगवेगळी प्रकरणं, राडे चांगलेच गाजले. अशातच काल बिग बॉसच्या  घरात एक धक्कादायक निर्णय बघायला मिळाला. आर्या जाधवला बिग बॉसने घराबाहेर काढलं. निक्की तांबोळीवर हात उगारल्याने आर्या जाधवला बिग बॉसने घराबाहेर जाण्याची मोठी शिक्षा सुनावली. अशातच घराबाहेर पडल्यानंतर आर्याने केलेली पहिली पोस्ट चर्चेत आहे.

आर्या जाधवची बाहेर आल्यावर पहिली पोस्ट

आर्या जाधवला बिग बॉसने काल घराबाहेर जाण्याची मोठी शिक्षा सुनावली. आर्याने तिची चूक कबूल केली. इतकंच नव्हे तिने निक्कीची माफीही मागितली. परंतु बिग बॉसच्या मूलभुत नियमाचं उल्लंंघन झाल्याने आर्याला बिग बॉस मराठीमधून बाहेर काढण्यात आलं. यानंतर आर्याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आहे. आर्याने काळा रंग आणि तुटलेलं Heart अशी पोस्ट करुन तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आर्याला या शिक्षेमुळे किती दुःख झालंय, याची कल्पना करता येईल.

 

लोक आर्याच्या बाजूने, म्हणतात...

कॅप्टनसी टास्कदरम्यान आर्या जाधवने निक्कीला कानाखाली वाजवली. त्यामुळे मोठा राडा झाला. सुरुवातीला बिग बॉसने आर्याला जेलमध्ये टाकलं. नंतर काल भाऊच्या धक्क्यावर रितेशभाऊच्या उपस्थितीत आर्याला बिग बॉसने घराबाहेर जायला सांगितलं. अनेकांना बिग बॉसचा हा निर्णय आवडला नाही. जास्तीत जास्त जनता आर्याच्या बाजूने असून तिला सपोर्ट करत आहेत. आर्याने  जे केलं ते बरोबर केलं, असं म्हणत बिग बॉसने दिलेल्या निर्णयाविरुद्ध लोकांनी नाराजी व्यक्त केलीय.

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठी