Join us
Daily Top 2Weekly Top 5

BIRTHDAY SPECIAL : 'अग्गंबाई सासूबाई'मधील बबड्या उर्फ आशुतोष पत्की हॉटेल मॅनेजमेंट सोडून वळला अभिनय क्षेत्राकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 12:29 IST

'अग्गंबाई सासूबाई'मधील बबड्या उर्फ आशुतोष पत्कीचा आज वाढदिवस आहे.

अग्गंबाई सासूबाई ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेतील सोहम उर्फ ‘बबड्या’ म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्की याने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. मालिकेत बबड्याचे पात्र निगेटिव्ह दाखवण्यात आले आहे. यामुळे लोकांना त्याची चीड असून यावरुन अनेक मीम्सही व्हायरल होत असतात. आज आशुतोष पत्कीचा वाढदिवस असून सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

आशुतोष पत्कीचा जन्म २२ डिसेंबर रोजी मुंबईत झाला आहे. आशुतोष ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा असून अग्गंबाई सासूबाईच्या आधी त्याने काही मालिकांमध्ये काम केले होते. त्याचसोबत त्याने वन्स मोअर या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आहे. अभिनय हे आशुतोषचे पॅशन आहे. त्यामुळेच बारावीनंतर हॅाटेल मॅनेजमेंट पूर्ण करून तो थेट अभिनयाकडे वळला. अनुपम खेर यांच्या अ‍ॅकॅडमीमध्ये त्याने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या मालिकेत त्याने काम केले. 

वडील जरी संगीतकार असले तरी अभिनयाकडे वळण्याबाबत आशुतोषने लोकमतशी बोलताना सांगितले होते की , गाणं आणि संगीत हे लहानपणापासून माझ्या आयुष्याचा एक भाग बनले आहे. पण अभिनय हे माझे पॅशन आहे. बाबांनीही कधीच कोणत्याही गोष्टीसाठी मला फोर्स केला नाही की कोणतीही गोष्ट करायला अडवले नाही. त्यामुळे हॅाटेल मॅनेजमेंटनंतर अभिनयाचं ट्रेनिंग घेऊन मी मालिकांमध्ये काम केले.

अशोक पत्की यांनी आजवर अनेक गीतांना संगीत दिले आहे. त्यांनी संगीत दिलेली अनेक मालिकांची शीर्षक गीतं तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहेत.

वादळवाट, गोट्या, आभाळमाया, अस्मिता, गोट्या यांसारख्या अनेक मालिकांची शीर्षक गीतं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अग्गंबाई सासूबाई या मालिकेच्या शीर्षक गीताला देखील अशोक पत्की यांनीच संगीत दिले आहे.

टॅग्स :अग्गंबाई सासूबाईअशोक पत्की