Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस' फेम 'या' अभिनेत्रीवर जीवघेणा हल्ला, अन्य स्पर्धकाच्या सपोर्टरने कृत्य केल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 11:01 IST

तिची अवस्था बघून चाहतेही चिंतेत पडले आहेत.

'बिग बॉस' तमिळ फेम अभिनेत्री वनिता विजयकुमारवर (Vanita Vijaykumar) नुकतंच एका अज्ञाताने हल्ला केल्याची घटना घडली आहे. अज्ञाताने तिच्या चेहऱ्यावर बरेच वार केले आहेत ज्यामुळे तिचा चेहरा गंभीर सुजला आहे. वनिताने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिची अवस्था दाखवली आहे. हे बघून चाहतेही चिंतेत पडले आहेत. 

रविवारी वनिताने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. यासोबत तिने लिहिले,'खूप हिंमतीने मी ही पोस्ट कर आहे. बिग बॉस 7 तमिळ हा टीव्हीवरील केवळ एक गेम शो आहे. मी यातून जाण्यास अजिबातच पात्र नाही.'

यासोबतच तिने आणखी एक पोस्ट करत लिहिले,'देव जाणे कोणी हा भयानक हल्ला केला? एक कथित प्रदीप एंटनी सपोर्टर...मी बिग बॉस ७ तमिळचा रिव्ह्यू संपवला आणि जेवण केले. नंतर मी माझ्या बहिणीच्या घरी कार पार्क केली होती तिथे गेले आणि अंधारात अचानक कोण कुठून आला कळलं नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्यावर जोरात हल्ला केला. मी रक्तबंबाळ झाले होते आणि ओरडत होते.'

तिने पुढे लिहिले,'जवळपास १ वाजता आजूबाजूला कोणीच नव्हतं. मी बहिणीला खाली बोलावलं, तिने मला पोलिसात तक्रार देऊया सांगितलं पण मी म्हणाले माझा सिस्टीमवरचा विश्वास उठला आहे. मी उपचार घेतले पण कोणी हल्ला केला हे मला कळलंच नाही. तो माणूस वेड्यासारखा हसत होता त्याचा आवाज अजूनही कानात घुमत आहे. मी स्क्रीनवर दिसण्याच्या परिस्थितीत नाही त्यामुळे मी आता ब्रेक घेतला आहे. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार