Join us

Bigg Boss OTT: नेहा भसीनची प्रतिक सहजपलसोबत वाढतेय जवळीक, यावर अखेर नवरा समीरूद्दीनने सोडले मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 18:36 IST

बिग बॉस ओटीटी शोमधील गायिका नेहा भसीन सध्या खूप चर्चेत आली आहे.

गायिका नेहा भसीन वादग्रस्‍त रिअॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी'मध्‍ये सहभाग घेतल्‍यापासून तिची धाडसी विधाने आणि नीडर वृत्तीसाठी खूपच चर्चेत आहे. नेहा भसीन शोच्‍या नेटिझन्‍समध्‍ये खूपच लोकप्रिय आहे. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते शोमधील तिचे बदलणारे कनेक्‍शन्‍स आणि तिचे नवीन कनेक्‍शन प्रतिक सहजपलसोबतच्‍या तिच्‍या जवळीकीने! ते शोमध्‍ये अनेकदा प्रेममय क्षणांचा आनंद घेताना दिसून आले. त्‍यांच्‍या कनेक्‍शनला ऑनलाइन अनेक टिकांचा सामना करावा लागला आणि त्‍यांच्‍यामधील जवळीकीबाबत प्रश्‍न विचारण्‍यात आले. नेहा भसीनच्या पतीने दोघांमधील वाढवणाऱ्या या जवळीकीवर मौन सोडले आहे. 

सेन्‍सेशनल गायिका घरामध्‍ये आपली छाप पाडत आहे आणि चाहते देखील व्‍हर्च्‍युअल विश्‍वातील इंटरनेटवर धुमाकूळ निर्माण करत आहेत. नेहा भसीनचा पती समीरूद्दीनने घरामध्‍ये प्रतिकसोबतच्‍या तिच्‍या नात्‍याबाबत मौन सोडले. तो म्‍हणाला की,'खरेतर त्‍याला कनेक्‍शन आवडते आणि शोचा आनंद घेत आहे. समीरूद्दीन परिपक्‍वपणे या समस्‍येचा सामना करताना आणि बिग बॉस ओटीटी घराबाहेरून तिला पाठिंबा देताना दिसण्‍यात आला.  

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत समीरूद्दीनने सांगितले की,सततचे वादविवाद, कोण शांत, सर्वोत्तम, स्‍मार्टर आहे, मिठ्या मारणे, भांडण, फ्लर्टिंग, एकमेकांची थट्टा व मस्‍करी करणे हे शाळेतील लहान मुलांसारखेच आहे. खरेतर आजही ती तिच्‍या शाळेतील मित्रमैत्रिणींना भेटते. ती अगदी अशीच आहे! दुसरीकडे त्‍या दोघांचा एकमेकांप्रती स्‍पष्‍ट दृष्टिकोन असू शकतो, ते एकमेकांना शांत करू शकतात, चूक दाखवून देऊ शकतात आणि परिपक्‍वरित्‍या खुल्‍या मनाने बोलू शकतात. असे वाटते की, ते एकमेकांना दीर्घकाळापासून ओळखत आहेत.  

तो पुढे म्‍हणाला, प्रतिकनेच नेहाला निवडले. हार्टस् गेममध्‍ये ती स्‍वत:हून गेम खेळण्‍यास सज्‍ज असल्‍यासारखी दिसली, कारण तिला माहित होते की हा गेम दीर्घकाळापर्यंतच्‍या कनेक्‍शन्‍सबाबत होता. ती भावनिकदृष्‍ट्या निराश झाली आणि त्‍यावेळी तिची तिच्‍या जीवनाप्रमाणे शांतता मिळण्‍याची इच्‍छा होती. तिने एकटीने अनेक आव्‍हानांचा सामना केला आहे. ती घरामध्‍ये देखील आव्‍हानांचा सामना करण्‍यास सज्‍ज होती. पण प्रतिकने 'कनेक्‍शन' तोडून नेहासोबत नवीन कनेक्‍शन सुरू केले, तेव्‍हा मला वाटले की ते दोघेही फायरब्रॅण्‍ड्स आहेत आणि प्रत्‍येक पैलूमध्‍ये समान आहेत. त्‍यांच्‍यामध्‍ये झालेले कनेक्‍शन चांगलेच होते आणि त्‍याचा परिणाम दिसून येत आहे. ती शांत, केंद्रित असण्‍यासोबत तिच्‍या आसपास घडणाऱ्या गोष्‍टींबाबत अधिक दक्ष असते.

टॅग्स :बिग बॉसनेहा भसीन