Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत 'बिग बॉस' फेम एल्विश यादवचा साखरपुडा! फोटो शेअर करत म्हणाला- "मला प्रेम मिळालं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 08:48 IST

सोशल मीडियावर प्रेमाची कबुली एल्विशने देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. बिग बॉस फेम एल्विश यादव मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात आहे.

बिग बॉस ओटीटी फेम आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या एल्विश यादवने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. एल्विशला त्याचं प्रेम मिळालं आहे. सोशल मीडियावर प्रेमाची कबुली एल्विशने देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. बिग बॉस फेम एल्विश यादव मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात आहे. त्याने अभिनेत्रीसोबत गुपचूप साखरपुडाही केला आहे. 

एल्विशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने एका मुलीचा हात हातात घेतल्याचं दिसत आहे. त्या मुलीच्या हातात अंगठी दिसत आहे. हा फोटो शेअर करत एल्विशने "प्रेमाला आणखी एक संधी दिली आणि मला माझं प्रेम मिळालं" असं म्हणत प्रेमाची कबुली दिली आहे. एल्विश ज्या मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री जिया शंकर आहे. या स्टोरीमध्ये त्याने जियाला टॅग केलं आहे. पण एल्विशने जियासोबत खरंच साखरपुडा केला की कोणत्या प्रमोशनचा हा भाग आहे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

काही दिवसांपासून जिया शंकरच्या पर्सनल लाइफबाबत चर्चा रंगल्या होत्या. तिच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र जिया नेमकं कोणाला डेट करतेय हे तिने गुलदस्त्यात ठेवलं होतं. जियाचा मिस्ट्री मॅन कोण हे आता समोर आलं आहे. जिया एल्विश यादवला डेट करत होती, हे चाहत्यांना आता कळलं आहे. जियाने काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. रितेश देशमुखच्या वेड सिनेमात ती दिसली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Elvish Yadav Engaged to Marathi Actress Jiya Shankar: 'Found Love'

Web Summary : Big Boss fame Elvish Yadav announced his engagement to Marathi actress Jiya Shankar. He shared a photo on Instagram, sparking speculation about a possible promotional stunt. Jiya previously starred in the movie 'Ved'.
टॅग्स :बिग बॉस १९टिव्ही कलाकार