Join us

Bigg Boss OTT 3 मध्ये आज शॉकिंग एलिमिनेशन! अरमान मलिकची एक पत्नी घराबाहेर जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 15:41 IST

BB ओटीटीचं हे तिसरं पर्व युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नींमुळे चांगलंच चर्चेत आहे.

बिग बॉस ओटीटी 3 (Bigg Boss OTT 3) मध्ये लवकरच शॉकिंग एलिमिनेशन होणार असल्याची चर्चा आहे. BB ओटीटीचं हे तिसरं पर्व युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नींमुळे चांगलंच चर्चेत आहे. या तिघांना शोमध्ये घेतल्यावरुन बरीच टीका झाली. या सिझनमध्ये नीरज गोयतचं पहिलं एलिमिनेशन झालं. या आठवड्यात आता सात स्पर्धक नॉमिनेट झाले होते. माध्यम रिपोर्टनुसार अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिकचाच बिग बॉसचा प्रवास संपणार असल्याची चर्चा आहे. 

बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सध्या स्पर्धकांमध्येच कटकारस्थान सुरु आहे. प्रत्येक स्पर्धक इथे टिकून राहण्यासाठी जोर लावत आहे. तर युट्यूबर अरमान मलिकला आपल्या दोन्ही पत्नींसोबत जुळवून घेत इतरांचा सामना करायचा आहे. दरम्यान आता अरमानची पहिली पत्नीच एलिमिनेट होणार असणार चर्चा आहे. यामुळे अरमानला काही फायदा होणार का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे. नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत १५ स्पर्धकांनी झाडामागे जात २ स्पर्धकांचं नाव नॉमिनेट केलं. यामध्ये अरमान मलिक, पायल मलिक, साई केतन राव, सना सुलतान, लव कटारिया, शिवानी कुमारी आणि दीपक चौरसिया यांना सर्वात जास्त नॉमिनेशन मिळाले.

'द खबरी'च्या रिपोर्टनुसार, स्पर्धकांचं वोटिंग आणि प्रेक्षकांची कमी मतं मिळाल्याने या आठवड्यात पायल मलिक घरातून बाहेर पडणार आहे. अद्याप याबाबतचा अधिकृत व्हिडिओ समोर आलेला नाही. यात किती तथ्य आहे हे आज रात्री शोमध्ये समजणारच आहे.

टॅग्स :बिग बॉसटेलिव्हिजन