Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुझा नवरा माझा हाफ Husband अन् माझा नवरा...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं वादग्रस्त विधान, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 15:39 IST

'बिग बॉस'च्या घरात चर्चेत असलेल्या पौलोमीने घराबाहेर पडताच केलेल्या विधानाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. सध्या 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व चांगलंच चर्चेत आहे. यंदाच्या सीझनमध्ये अभिनेत्री पौलौमी दास सहभागी झाली होती. पण, तिचा या शोमधील प्रवास संपला आहे. 'बिग बॉस'च्या घरात चर्चेत असलेल्या पौलोमीने घराबाहेर पडताच केलेल्या विधानाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

पौलोमीने घराबाहेर येताच फिल्मीज्ञानला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला अरमान मलिक आणि कृतिकाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. "तुझी बेस्ट फ्रेंडदेखील कृतिकासारखी वागली असती तर?" असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना पौलोमीने वादग्रस्त विधान केलं आहे. पौलोमी म्हणाली, "नाही. माझी बेस्ट फ्रेंड विवाहित आहे. मी तिला कधी कधी म्हणते की तुझा नवरा माझा हाफ husband आहे". 

"आम्ही एकदा गोव्याला फिरायला गेलो होतो. तिथे आम्हाला रुम मिळत नव्हती. त्यामुळे आम्ही तिघांनी एकच रुम शेअर केली होती. माझ्या मैत्रिणीची पाठ दुखत होती. त्यामुळे ती बेडच्या एका कोपऱ्यात झोपली होती. तर तिचा पती बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यात झोपला होता. त्यामुळे मला त्या दोघांच्या मध्ये झोपावं लागलं होतं. तेव्हा मी तिला म्हणाले होते की हा माझा हाफ husband झाला. मी तिला म्हणाले की जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा माझा नवरा तुझा हाफ husband होईल. आणि आमचं डील पक्क झालं", असंही पौलोमीने पुढे सांगितलं. 

पौलोमी आणि तिची मैत्रीण गमतीत असं म्हणत होत्या, असंदेखील पुढे ती म्हणाली. पण, पौलोमीच्या या वक्तव्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांनी तिला चांगलचं सुनावलं आहे.  

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार