Join us
Daily Top 2Weekly Top 5

BB OTT 3: "प्रत्येक पुरुषाला दोन बायका हव्या असतात", अरमान मलिकच्या वादग्रस्त वक्तव्यावर देवोलिना भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 15:22 IST

अरमान मलिकचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ देवोलिनाने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो "हे नातं मी नाही तर माझ्या दोन्ही पत्नी निभावत आहेत. प्रत्येक पुरुषाला वाटतं की त्याच्या दोन बायका असाव्यात", असं म्हणत आहे. अरमानने बिग बॉसच्या घरात केलेलं वक्तव्य ऐकून देवोलिनाने संतप्त ट्वीट केलं आहे. 

Bigg Boss OTT 3: अलिकडेच सुरू झालेला 'बिग बॉस ओटीटी'चा नवा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यंदाच्या सीझनमध्ये युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिकाला घेऊन सहभागी झाला आहे. बिग बॉसच्या घरात अरमानला पाहून अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने संताप व्यक्त केला होता. आता त्याच्या एका वक्तव्याने ती पुन्हा भडकली आहे. 

अरमान मलिकचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ देवोलिनाने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो "हे नातं मी नाही तर माझ्या दोन्ही पत्नी निभावत आहेत. प्रत्येक पुरुषाला वाटतं की त्याच्या दोन बायका असाव्यात", असं म्हणत आहे. अरमानने बिग बॉसच्या घरात केलेलं वक्तव्य ऐकून देवोलिनाने संतप्त ट्वीट केलं आहे. 

अरमान मलिकवर भडकली देवोलिना भट्टाचार्जी

प्रत्येक पुरुषाबाबत मी सांगू शकत नाही. पण, अश्लील हेतू असणाऱ्या पुरुषांना नक्कीच २,३, ४ बायका हव्या असतात. कृपा करून हा गलिच्छपणा थांबवा. 

जेव्हा त्या बायका त्यांनादेखील दोन पती हवे असल्याच्या इच्छा व्यक्त करतील, तेव्हा तेदेखील बघताना आनंद व्यक्त करा. 

मला वाटत नाही तो दिवस पण दूर असेल...तेव्हा मला "हे त्यांचं आयुष्य आहे. जर ते एकत्र आनंदी आहेत, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?" असं म्हणणाऱ्यांना बघायला आवडेल. 

हे कर्मा सायकल अशाच पद्धतीने काम करतं. जेव्हा एक मुलगी दोन मुलांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करेल आणि त्यांना खूश ठेवेन असं सांगेल...तेव्हा तुमच्यापैकी किती लोक तिला पाठिंबा देतात हे मला पाहायचं आहे. तेव्हा तुम्ही तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवाल. 

एक समाज म्हणून आपण चुकीच्या मार्गावर आहोत...काही वर्षांपासून चुकीच्या गोष्टी चालत आल्या असतील, तर त्या पुढे चालवण्याची गरज नाही. यामुळे प्रत्येक चुकीची गोष्ट बरोबर आहे, असा अर्थ होतो. माझ्यासाठी हे चुकीचं आहे. एकापेक्षा जास्त पत्नी असणंदेखील चुकीचं आहे आणि ते चुकीचंच राहील. पण, काय करणार...काही लोक असे आहेत, जोपर्यंत स्वत: खड्ड्यात पडत नाहीत, तोपर्यंत त्यांना समजत नाही...ऑल द बेस्ट

देवोलिनाने याआधीही अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नींना बिग बॉसच्या घरात पाहून संताप व्यक्त केला होता. "बिग बॉसवर इतके वाईट दिवस आलेत का?" असं ती म्हणाली होती.  

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकारदेवोलिना भट्टाचार्जी