Join us

'बिग बॉस' विजेता एल्विश यादवकडे १ कोटींच्या खंडणीची मागणी, अज्ञाताविरोधात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 10:20 IST

एल्विश यादवकडे आहे कोट्यवधींची संपत्ती

'बिग बॉस ओटीटी 2' चा विजेता एल्विश यादवला (Elvish Yadav) नुकतंच धमक्यांचे फोन आले आहेत. काही अज्ञातांनी एल्विशकडे तब्बल 1 कोटींची खंडणी मागितली आहे. याविरोधात एल्विशने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. गुरुग्राम पोलिसांनी नोंद घेत अज्ञातांविरोधात केस दाखल केली असून तपासाला सुरुवात केली आहे.

माध्यम रिपोर्टनुसार, 25 ऑक्टोबरला एल्विश यादवने दाखल केलेल्या तक्रारीनुसार एका अज्ञाताने त्याला फोन करुन 1 कोटी रुपये मागितले. तेव्हा एल्विश वजीराबाद गावात होता. फोन कोणी केलाय हे त्याला कळलं नाही. त्याने लगेच पोलिसात तक्रार दिली. 

एल्विश यादवकडे कोट्यवधींची संपत्ती

एल्विश हा युट्युबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. त्याचे दोन युट्यूब चॅनल्स आहेत. बिग बॉस ओटीटीमध्ये आल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. इतकंच नाही तर तो विजेताही ठरला आणि एका रात्रीत करोडपती झाला. त्याने म्युझिक व्हिडिओजमध्येही काम केलं आहे. उर्वशी रौतेला, शहनाज गिल, ईशा गुप्ता या अभिनेत्रींसोबत त्याचे म्युझिक व्हिडिओ आले. एल्विशने 2016 मध्ये युट्यूबच्या जगात प्रवेश केला. आज तो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. आलिशान घर, गाड्या असं सगळंच त्याने मिळवलं आहे. 

'बिग बॉस ओटीटी 2' चा विजेता ठरल्यानंतर एल्विशने दुबईतही आलिशान घर घेतलं ज्याची किंमत कोटीत आहे. त्याच्याकडे पोर्श, फॉर्च्युनर या महागड्या गाड्याही आहेत. प्रत्येक गाडीची किंमत अडीच कोटींच्या घरात आहे.

टॅग्स :बिग बॉसखंडणीपोलिसदिल्ली