Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस ओटीटी' फेम मनीषा राणीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 09:12 IST

'बिग बॉस ओटीटी' फेम मनीषा राणीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल

मनीषा राणी ही कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय आहे .तिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.   सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना व्यावसायिक कामासह वैयक्तिक आयुष्यासंबंधित अपडेट देत असते. यातच मनीषा राणी हिच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मनीषा राणीची तब्येत बिघडली असून तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

मनीषाचा रुग्णालयातील फोटो व्हायरल झाला आहे. तिच्या एका फॅन पेजनं हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मनीषा हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली दिसून येत आहे. नेमका तिला कशाचा त्रास झाला, ही माहिती समोर आलेली नाही. मनिषाचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.  तसेच तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. 

मनीषा राणीने 'बिग बॉस ओटीटी 2' या लोकप्रिय शोमधून चाहत्यांचं मनोरंजन केलं.  ती 'बिग बॉस OTT 2' मध्ये टॉप 3 मध्ये पोहोचली होती. यानंतर ती अभिषेक मल्हानसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली. तसेच मनीषाने बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवसोबत एक म्युझिक व्हिडीओ देखील केला. जो खूप हिट झाला होता. नुकतंच मनिषा 'झलक दिखला जा' या डान्स रिॲलिटी शोमध्येही दिसली. लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 2' नंतर मनीषा राणीचं नशीब बदललं.  ग्लॅमरस दुनियेत मनीषा प्रसिद्ध झाली आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटीहॉस्पिटलबिग बॉस