Join us
Daily Top 2Weekly Top 5

"वाईल्ड कार्ड नव्हे,तर चाइल्ड कार्ड...", रितेश देशमुख रेवा-संस्कृतीवर बरसला, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:32 IST

Bigg Boss Marathi 6: हलगर्जीपणामुळे पॉवर की गमावलेल्या संस्कृती-रेवावर रितेश भडकला, म्हणाला...

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन सुरु होऊन आता जवळपास आठ आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. घरातील स्पर्धकांची खेळी आणि हटके ट्विस्टमुळे हा शो चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. बिग बॉस शोमधील सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे भाऊचा धक्का असतो. भाऊच्या धक्क्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. या धक्क्यावर रितेश देशमुख कोणाची शाळा घेणार कोणाचं कौतुक करणार हे पाहण्याची प्रेक्षक उत्सुक असतात. त्यात अलिकडेच घरात तीन सदस्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक, संस्कृती साळुंखे आणि रेवा कौरासे हे कलाकार यावेळी बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेत. त्यांच्या येण्याने बिग बॉसच्या घरात काय बदल होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक होते.

दरम्यान, नुकताच सोशल मीडियावर ४ मार्च रोजी होणाऱ्या रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्याचा पहिला प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये रितेश नव्या वाइल्ड कार्ड सदस्यांना ओरडताना दिसतोय. याचं कारण म्हणजे संकेत रेवा आणि संस्कृती या तिघांनाही घरात एन्ट्री घेताना पॉवर की देण्यात आल्या होत्या.मात्र, रेवा आणि संस्कुतीने दोघींनीही घरात जाताच पॉवर की गमावल्या होत्या. त्यावरुन आता भाऊच्या धक्क्यावर रितेश त्यांची चांगलीच शाळा घेणार आहे.

बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच विशालने संस्कृतीची पावर की गायब केली. यामुळे संस्कुतीला तिची इम्युनिटी तिला गमवावी लागली. त्यानंतर प्राजक्ता शुक्रेनेही रेवाला बोलण्या-बोलण्यात गांगरवत तिची पॉवर की पळवली. आयती मिळालेली पावर की आपल्या हलगर्जीपणाने गमावल्यामुळे रितेश या दोघींवर चांगलाच बरसला आहे. 

रितेश काय म्हणाला?

कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रितेश म्हणतो की," संस्कृती आणि रेवा तुम्ही पावर की घालवली. तुम्ही आठवड्याभरात जे काही करत होता तो बालिशपणा होता, निष्काळजीपणा, बेपर्वाही, बेजबाबदारी होती... त्यावरून असं वाटतं की बिग बॉस ने घरात वर्ल्ड कार्ड नाही तर चाइल्ड कार्ड पाठवले आहे. रितेशच बोलणं ऐकून रेवाला रडू येतात तर संस्कृती ही शांत असते."

दरम्यान, बिग बॉसच्या घरात या आठवड्यात पॉवर की वरून जो काही गोंधळ झाला तो निव्वळ हास्यास्पद होता. नेटकऱ्यांनी सोशळ मीडियावर समोर आलेला हा व्हिडीओ पाहून भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत."Wild card एवढे पॉवरफुल वाटत नाही...", अशा कमेंट्स नेटकऱ्य़ांनी केल्या आहेत. तर अनेकांनी आपल्या आवडीत्या स्पर्धकांना पाठिंबा दिला आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठी ६रितेश देशमुखटेलिव्हिजनसोशल मीडियाव्हायरल व्हिडिओ