Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रशस्त हॉल, आकर्षक इंटिरिअर अन्...; 'बिग बॉस' फेम सूरज चव्हाणचा हक्काच्या घरात गृहप्रवेश! दाखवली पहिली झलक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 09:06 IST

'गुलीगत किंग' सूरज चव्हाणचं नवं घर आहे खूपच सुंदर, व्हिडीओ बघाच 

Suraj Chavan New House: 'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वातून सूरज चव्हाण हे नाव घराघरात पोहोचलं. आपल्या झापुक झुपूक अंदाजात गुलिगत किंगने  बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या शोनंतर सूरजचा चाहतावर्ग कमालीचा वाढला आहे. दरम्यान,या शोमध्ये सूरजने आपलं एक हक्काचं घर असावं असं स्वप्न पाहिलं होतं. अखेर त्याचं हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. नुकताच सूरजने त्याच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. सोशल मीडियावर याचा सुंदर व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. 

गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण आज जरी लाखो चाहत्यांच्या हृदयात घर करून बसला असला, तरी त्याच्या आयुष्याच्या पायवाटा काट्यांनी आणि अश्रूंनी भरलेल्या होत्या. लहानपणी आई-वडिलांचं छत्र हरवल्यानंतर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्याने दिवस काढले. अशा खडतर परिस्थितीतून बाहेर आलेला हा मुलगा आज अनेकांच्या मनावर राज्य करतो आहे. त्यात आता नुकतंच सुरजच्या घराचं काम पूर्ण झालं आणि काल त्याने गृहप्रवेश देखील केला. अशातच त्याच्या लग्नाची लगबग देखील सुरू झाली आहे. लग्नाआधी नव्या घरात प्रवेश करता आला म्हणून सुरज खूपच खुश असलेला पाहायला मिळतोय.

सोशल मीडिया रील्समुळे  घराघरांत लोकप्रिय झालेल्या सूरजचं खरं नशीब ‘बिग बॉस’मुळे बदललं. यामुळेच, शो संपताना सूरजने आता गावी जाऊन सर्वात आधी आपलं हक्काचं घर बांधणार हा निश्चय मनाशी केला होता. अखेर त्याचं स्वप्न पूर्णत्वास आलं आहे. बारामतीच्या या सुपुत्राला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला लवकरात लवकर हक्काचं घर बांधून देण्यात येईल असा शब्द दिला होता. आता त्या घरात सूरजने  ग़हप्रवेश केला आहे. 

सध्या सूरज चव्हाणवर त्याच्या चाहते मंडळींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. खरंच सूरजला बघून अभिमान वाटतो आई जगदंबेच्या करपेने सर्व काही ठीक झालं देवाच्या परीक्षांमध्ये सुरज तू पास झालास खरंच अभिमान वाटतो तुला पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा…",तसंच आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय," यावरून कळते की नशिबात लिहिलेले कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही…", अशा कमेंट्स करत चाहत्यांनी सूरज चव्हाणवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Big Boss Fame Suraj Chavan Enters New Home: First Glimpse!

Web Summary : Suraj Chavan, rose to fame from Big Boss Marathi, realized his dream of owning a home. Overcoming hardship, he recently celebrated his housewarming. Ajit Pawar promised Suraj a home, and now construction is underway. Fans shower congratulations.
टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडिया