Join us

सूरज चव्हाणचं लग्न ठरलं? 'त्या' फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण, कॅप्शनने वेधलं लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 09:35 IST

सूरज चव्हाणने शेअर केलेल्या लेटेस्ट पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

 Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या पोस्टमुळे सूरजचं लग्न किंवा साखरपुडा ठरल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

सूरजने शेअर केलेली एक नवीन पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सूरज हा साऊथ इंडियन लूकमध्ये पाहायला मिळत आहे. सूरज या फोटोमध्ये एका मुलीच्या खांद्यावर हात ठेवून पोज दिल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, सूरजच्या बाजूला उभ्या असलेल्या या मुलीचा चेहरा रिव्हिल करण्यात आलेला नाही. तिच्या हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा पाहायला मिळतोय. सुंदर साडी, केसात गजरा, हातात चुडा असा लूक या मुलीने केलेला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सूरजने लव्ह इमोजी दिला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

सोशल मीडियावर सूरजची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आणि अनेकांनी तर त्याचे अभिनंदनही केले. सूरजच्या आयुष्यात खरंच पुन्हा प्रेम परतलं असल्यास त्याचे चाहते प्रचंड खूश असणार आहेत. कारण, 'बिग बॉस मराठी'च्या घरात असताना वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना सूरजने अनेकदा प्रेमात 'गुलिगत धोका' मिळाल्याबद्दल भाष्य केलेले. त्यामुळे सध्या समोर आलेला फोटो पाहून सूरज पुन्हा एकदा प्रेमात पडला की काय, अशी चर्चा आहे. सध्या तरी सूरजने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्याच्या चाहत्यांना आता त्याच्याकडून अधिकृत घोषणेची उत्सुकतेने प्रतीक्षा आहे.

दरम्यान, 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व जिंकल्यानंतर सूरजने केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती.  २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे चित्रपट मोठा फ्लॉप ठरला.  'बिग बॉस मराठी'च्या घरात सूरजला मिळालेली लोकप्रियता पाहता, चित्रपट फ्लॉप होईल असे निर्मात्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. त्यामुळे केदार शिंदे आणि सूरजसाठी हा खूप मोठा धक्का होता. 

टॅग्स :मराठी अभिनेताबिग बॉस मराठीसेलिब्रिटी